Home / News / Gaikwad, Sarvankar Spark Controversy : एकाचे 3 तर दुसऱ्याचे 20 कोटी शिंदे नेत्यांच्या विधानांनी खळबळ

Gaikwad, Sarvankar Spark Controversy : एकाचे 3 तर दुसऱ्याचे 20 कोटी शिंदे नेत्यांच्या विधानांनी खळबळ

MLA Sanjay Gaikwad & EX MLA Sada Sarvankar Shinde Leaders statements Spark Controversy Gaikwad, Sarvankar Spark Controversy – एकाचे तीन...

By: Team Navakal
Gaikwad, Sarvankar Spark Controversy

MLA Sanjay Gaikwad & EX MLA Sada Sarvankar Shinde Leaders statements Spark Controversy


Gaikwad, Sarvankar Spark Controversy – एकाचे तीन कोटी तर दुसऱ्याचे वीस कोटी अशा वादग्रस्त वक्तव्यांमुळे शिवसेना शिंदे(Shivsena Shinde Group) गटाचे विद्यमान आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad)आणि माजी आमदार सदा सरवणकर (EX MLA Sada Sarvankar) हे नेते  अडचणीत आले आहेत. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नियोजित असतानाच या दोन नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांनी  राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. (Shinde Leaders statements Spark Controversy)

आ. संजय गायकवाड बुलडाण्यातील कार्यक्रमात म्हणाले की, निवडणुकीत तीन कोटींचा खर्च आणि शंभर बोकड वाटले जातात. तर दादर-माहीम परिसरातील एका कार्यक्रमात सदा सरवणकर यांनी आमदार नसतानाही मला 20 कोटींचा निधी मिळतो असा दावा केला.
आमदार संजय गायकवाड बुलडाण्यात म्हणाले की, आम्ही शिवसेना-भाजपा  महायुतीला प्राधान्य देणार आहोत.

आम्हाला प्रामाणिकपणे युती हवी आहे. कारण विधानसभेसाठी युती होते, लोकसभेसाठी युती होते, पण ज्या वेळेस छोट्या कार्यकर्त्यांची गरज असते, त्यावेळी त्यांना वाऱ्यावर सोडले जाते. कार्यकर्त्यांनी पैसे खर्च करून काय मातीत जायचे का?  आता जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुका इतक्या सोप्या राहिलेल्या नाहीत.

एक-एक, दोन-दोन, तीन-तीन कोटी रुपये खर्च होतात. काही ठिकाणी तर शंभर बोकड एका व्यक्तीकडून दिले जातात. इतक्या महागड्या निवडणुकांमुळे कार्यकर्ते उद्ध्वस्त होतात. आमची प्रामाणिक इच्छा आहे की, जे धोरण चिखलीला लागू होईल, जे मलकापूरला लागू होईल, तेच धोरण जर बुलडाण्यासाठी
ठरत असेल तर आम्ही युतीस तयार आहोत.


माजी आमदार सदा सरवणकर मुंबईत दादर माहीमला एका कार्यक्रमात म्हणाले की, मी जरी सध्या आमदार नसलो तरी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या पाठिंब्यामुळे माझी कामे  सुरूच आहेत. प्रत्येक बिल्डिंगमध्ये मी विकासकामे  केली आहेत. विद्यमान आमदारांना फक्त 2 कोटींचा निधी मिळतो. पण मला 20 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. म्हणून मी सगळीकडे उद्घाटन करताना दिसतो. कारण आपला कामाचा पिंड आहे.


सरवणकरांच्या या दाव्यावर उबाठाचे माहीमचे आमदार महेश सावंत यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, माजी आमदार सदा सरवणकर यांनी 20 ते 40 वर्षे याठिकाणी सत्ता गाजवली. त्यांच्यापेक्षा मोठा कोणीच नाही, असा त्यांचा समज आहे. परंतु जनतेने त्यांचा भ्रम दूर करून घरी बसण्याचा सल्ला दिला. असे असताना त्यांना 20 कोटी रुपयांचा निधी मिळाला.

माजी आमदारांना खैरात वाटली जात आहे. मानधन बंद झाले. मग स्वतःचा विकास कसा करणार? त्यामुळेच कदाचित 20 कोटींचा निधी मिळाला असेल. त्यांना 20 कोटी मिळत असतील तर आम्हाला 40 कोटी निधी मिळायला पाहिजे. आत्तापर्यंत 500 कोटींचा निधी कुठे गेला?याप्रकरणी  विधानसभा अध्यक्ष आणि मुख्यमंत्री यांच्याकडे अधिकृत तक्रार करणार आहे.


हे देखील वाचा 

स्वदेशी घ्या! आत्मनिर्भर बना पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आवाहन

भारतातल्या करव्यवस्थेत मोठा बदल, ‘GST 2.0 India’ मुळे गरजेच्या वस्तूंवर दिलासा

Web Title:
संबंधित बातम्या