Home / News / MP Raut Slams Jay Shah : रक्त एकच ना? वडलांप्रमाणे जय शाहांनीही निर्णय घ्यावा!संजय राऊत यांचे विधान

MP Raut Slams Jay Shah : रक्त एकच ना? वडलांप्रमाणे जय शाहांनीही निर्णय घ्यावा!संजय राऊत यांचे विधान

MP Raut Slams Jay Shah – काल भारत पाकिस्तान (India-Pakistan match) सामन्यावेळी पाकिस्तानी क्रिकेटपटूने गोळीबार केल्याचे हावभाव केले . त्यातून...

By: Team Navakal
MP Raut Slams Jay Shah

MP Raut Slams Jay Shah – काल भारत पाकिस्तान (India-Pakistan match) सामन्यावेळी पाकिस्तानी क्रिकेटपटूने गोळीबार केल्याचे हावभाव केले . त्यातून वाद सुरू झाला आहे .

(Shiv Sena (UBT))यावर उबाठा नेते संजय राऊत (MP Sanjay Raut)म्हणाले की काश्मीरमधील ३७० कलम त्यांचे वडील अमित शाह हे हटवू शकतात, तर जय शाहही भारत-पाकिस्तान सामन्यावर बंदी घालू शकतात.

रक्त एकच आहे. दुसरे तर रक्त नाही. डीएनएमध्ये अमित शाहांचे (Home Minister Amit Shah)राष्ट्रभक्तीचे रक्त आहे तर हे केले पाहिजे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi)यांनी जीएसटी (GST)सुधारणा अंमलबजावणीच्या पूर्वसंध्येला काल संध्याकाळी ५ वाजता देशाला संबोधित केले. यावर राऊत म्हणाले, भाजपा समर्थकांना, अंधभक्तांना ८ वाजता भारत पाकिस्तान सामना बघता यावा म्हणून मोदींनी संबोधनाची ही वेळ बदलली.

नेहमी आठ वाजता ते संबोधित करतात. यावेळी ते पाच वाजता आले. जीएसटी सुधारणेद्वारे मोदींनी दोन लाख कोटी रुपयांची सवलत दिली. त्यामुळे प्रत्येक भारतीयाला प्रत्येकी १२१३ रुपयांची बचत होईल. १५-१५ लाख रुपये दिले असते तर चांगले झाले असते. हे सगळे मूर्ख बनविण्याचे धंदे आहेत.

भारत-पाकिस्तान सामन्यावर सगळ्यात मोठा सट्टा भारतात खेळला जात असल्याचा आरोपही राऊत यांनी केला. ते म्हणाले की, पहिल्या सामन्याला सुमारे दीड लाख कोटींचा सट्टा खेळला. त्यापैकी सगळ्यात मोठा सट्टा गुजरातमध्ये खेळला जात आहे.

त्या सट्ट्यातील २५ हजार कोटी रुपये सरळ पाकिस्तानात जातात. कालच्या सामन्यावरही तसाच सट्टा खेळला गेला. दीड ते दोन लाख कोटींचा हा सट्टा खेळला. त्यातील पैसे पाकिस्तानला गेले. त्याच पैशातून भारतातल्या आपल्या निरपराध लोकांवर, जवानांवर गोळ्या झाडल्या जातात.


हे देखील वाचा 

क्लबमध्ये मुलींसाठी सुविधा हव्यात!सचिन तेंडुलकर यांचे आवाहन

आशियातील पहिली महिला पायलट सुरेखा यादव निवृत्त; 36 वर्षांचा प्रेरणादायी प्रवास संपला

Web Title:
संबंधित बातम्या