Ladki Bahin Yojana eKYC Process in Marathi: महाराष्ट्रातील महिलांसाठी सुरू केलेल्या ‘लाडकी बहीण योजना’ (Ladki Bahin Yojana) मध्ये मोठा गैरव्यवहार समोर आल्यानंतर राज्य सरकारने कठोर पाऊल उचलले आहे.
योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी आता सर्व पात्र महिलांना ऑनलाइन e-KYC करणे अनिवार्य करण्यात आले आहे. ही प्रक्रिया येत्या 2 महिन्यांत पूर्ण न केल्यास, संबंधित महिलांना मिळणारी 1,500 रुपयांची मासिक मदत बंद केली जाईल.
अपात्र व्यक्तींनाही मिळत होती मदत
जुलै 2024 मध्ये सुरू झालेल्या या योजनेचा उद्देश आर्थिकदृष्ट्या कमकुवत महिलांना दरमहा 1,500 रुपयांची आर्थिक मदत देणे आहे. मात्र, अलीकडेच सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, तब्बल 26 लाख हून अधिक अपात्र लोकांनी, ज्यात पुरुषांचाही समावेश आहे, योजनेत बेकायदेशीरपणे नाव नोंदवून लाभ घेतला आहे.
हा गैरव्यवहार थांबवण्यासाठीच आता आधार-आधारित पडताळणी (Aadhaar-based verification) सक्तीची करण्यात आली आहे. महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी या निर्णयामुळे केवळ पात्र लाभार्थ्यांनाच मदत मिळेल असे स्पष्ट केले आहे.
Ladki Bahin Yojana eKYC Process in Marathi: सोपी स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया
योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी लाभार्थ्यांनी खालीलप्रमाणे e-KYC प्रक्रिया पूर्ण करावी:
स्टेप 1: योजनेच्या अधिकृत पोर्टल ladki bahin.maharashtra.gov.in वर जा. मुखपृष्ठावर e-KYC बॅनरवर क्लिक करा.
स्टेप 2: तुमचा आधार क्रमांक आणि ‘कॅप्चा’ कोड भरून ‘आधार प्रमाणीकरणासाठी संमती’ द्या आणि ‘Send OTP’ वर क्लिक करा.
स्टेप 3: तुमच्या आधार-लिंक केलेल्या मोबाईल क्रमांकावर आलेला OTP नमूद करून ‘Submit’ करा.
स्टेप 4: यानंतर, तुम्ही विवाहित असल्यास पतीचा किंवा अविवाहित/घटस्फोटित असल्यास वडिलांचा आधार क्रमांक आणि ‘कॅप्चा’ कोड भरा. ‘संमती’ देऊन ‘Send OTP’ वर क्लिक करा.
स्टेप 5: संबंधित मोबाईलवर प्राप्त झालेला OTP नमूद करून ‘Submit’ करा.
स्टेप 6: त्यानंतर तुमचा जात प्रवर्ग निवडा आणि कुटुंबातील सदस्य शासकीय कर्मचारी किंवा निवृत्तीवेतन धारक नाहीत तसेच तुमच्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिलाच योजनेचा लाभ घेत आहे, असे प्रमाणित करून ‘Submit’ बटण दाबा.
स्टेप 7: शेवटी, “तुमची e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे” असा संदेश स्क्रीनवर दिसेल.
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या e-KYC साठीhttps://t.co/gBViSYZxcm या संकेतस्थळाला भेट द्यावी.
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) September 20, 2025
मुखपृष्ठावर असलेल्या e-KYC बॅनरवर क्लिक केल्यावर e KYC फॉर्म उघडेल.
या फॉर्ममध्ये लाभार्थ्याने आपला आधार क्रमांक आणि पडताळणी संकेतांक (Captcha Code) नमूद करून, आधार… pic.twitter.com/aNynvJb2Rp
सध्या अनेकांना आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाइलवर ओटीपी येत नाहीये. तसेच, ज्या महिला अविवाहित/घटस्फोटित असल्यास अथवा वडिलांचे निधन झाला असल्यास कोणाचा आधार कार्ड टाकावा असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र, अद्याप याबाबतची माहिती देण्यात आलेली नाही.
हे देखील वाचा – ‘लोक काय विचार करतात याची मला…’; भारताविरुद्धच्या सामन्यातील ‘गन गेस्चर’ सेलिब्रेशनवर पाकच्या खेळाडूचे स्पष्टीकरण