Home / लेख / कमी किमतीत आता अधिक सुरक्षित कार! फक्त 5 लाखांच्या बजेटमध्ये लाँच झाली ‘ही’ जबरदस्त गाडी

कमी किमतीत आता अधिक सुरक्षित कार! फक्त 5 लाखांच्या बजेटमध्ये लाँच झाली ‘ही’ जबरदस्त गाडी

Renault Kwid 10th Anniversary Edition : रेनो इंडियाने (Renault India) आपली लोकप्रिय हॅचबॅक कार क्विडच्या (Renault Kwid) 10 वर्षांच्या यशस्वी...

By: Team Navakal
Renault Kwid 10th Anniversary Edition

Renault Kwid 10th Anniversary Edition : रेनो इंडियाने (Renault India) आपली लोकप्रिय हॅचबॅक कार क्विडच्या (Renault Kwid) 10 वर्षांच्या यशस्वी प्रवासाच्या निमित्ताने एक खास ’10th Anniversary Edition’ लाँच केले आहे.

एसयूव्हीसारख्या डिझाइनमुळे नेहमीच एन्ट्री-लेव्हल सेगमेंटमध्ये लोकप्रिय असलेली ही कार आता नवीन सुरक्षा फीचर्स, अपडेटेड व्हर्जनसह आली आहे. जीएसटी 2.0 नंतरच्या नवीन किमतींसह ही कार बाजारात आली आहे.

Renault Kwid 10th Anniversary Edition : वैशिष्ट्ये

क्विडची ही खास 10th Anniversary Edition केवळ 500 युनिट्स मर्यादित आहे. ही ‘टेक्नो’ (Techno) व्हर्जनवर आधारित असून, मॅन्युअल ट्रान्समिशन (MT) व्हर्जनची किंमत 5.14 लाख रुपये आणि ऑटोमेटेड मॅन्युअल ट्रान्समिशन (AMT) व्हर्जनची किंमत 5.63 लाख रुपये आहे.

या खास व्हर्जनमध्ये नवीन ड्युअल-टोन कलर (Fiery Red + Black Roof आणि Shadow Grey + Black Roof) पर्याय मिळतात. याशिवाय, यात खास ब्लॅक फ्लेक्स व्हील्स, दरवाज्यावर आणि C-पिलरवर ॲनिव्हर्सरी डेकल्स आणि पिवळ्या रंगाचे ग्रिल इन्सर्ट्स देण्यात आले आहेत.

सुरक्षा आणि फीचर्समध्ये मोठे बदल

रेनोने आता सर्व Kwid व्हर्जनमध्ये मोठे बदल केले आहेत. आता सर्व मॉडेल्समध्ये 3-पॉइंट सीटबेल्ट्स देण्यात आले आहेत, तर टॉप-एंड ‘क्लाइंबर’ (Climber) व्हर्जनमध्ये आता 6 एअरबॅग्स (6 airbags) मिळतात.

यामुळे ही कार तिच्या सेगमेंटमधील सर्वात सुरक्षित गाड्यांपैकी एक बनली आहे. कंपनीने व्हर्जनची नावेही बदलली आहेत, जसे की पूर्वीच्या RXL ला आता ‘इव्होल्युशन’ (Evolution) आणि RXT ला ‘टेक्नो’ (Techno) असे नाव दिले आहे.

नवीन किमतीनुसार, Kwid ची सुरुवातीची किंमत आता 4.29 लाख (Authentic MT) रुपयांपासून सुरू होते, तर टॉप व्हर्जनची किंमत 5.99 लाख (Climber AMT DT) रुपयांपर्यंत आहे. हे बदल Kwid ला कमी बजेटमध्ये स्टाईल, ॲडव्हान्स सेफ्टी आणि आधुनिक फीचर्सचा शोध घेणाऱ्या ग्राहकांसाठी एक उत्तम पर्याय बनवतात.

हे देखील वाचा जामीन मिळाल्यावर कैद्यांसाठी केला ‘नागीण डान्स’; रिया चक्रवर्तीने सांगितला तुरुंगातील अनुभव

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या