Home / क्रीडा / Pakistan Controversy – क्रिकेटप्रमाणे पाकिस्तानच्या फुटबॉलपटूचे सेलिब्रेशनही वादात

Pakistan Controversy – क्रिकेटप्रमाणे पाकिस्तानच्या फुटबॉलपटूचे सेलिब्रेशनही वादात

Pakistan Controversy – क्रिकेटप्रमाणे पाकिस्तानच्या फुटबॉलपटूचे सेलिब्रेशनही वादात- आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत (Asia Cup cricket clash)भारत आणि पाकिस्तान संघांमध्ये वादाची...

By: Team Navakal
Pakistan Controversy


Pakistan Controversy – क्रिकेटप्रमाणे पाकिस्तानच्या फुटबॉलपटूचे सेलिब्रेशनही वादात- आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत (Asia Cup cricket clash)भारत आणि पाकिस्तान संघांमध्ये वादाची ठिणगी पडली असतानाच, तसाच काहीसा प्रकार सॅफ यू१७ (SAFF U-17 tournament)फुटबॉलच्या मैदानावर पाहायला मिळाली. क्रिकेट सामन्यानंतर काही तासांतच भारत आणि पाकिस्तानचे युवा फुटबॉलपटू श्रीलंकेत एकमेकांविरुद्ध उभे राहिले.

या सामन्याच्या निकालावर ब गटातील अव्वल संघाचा निर्णय होणार होता. मध्यंतराला पाकिस्तानचा आघाडीचा खेळाडू मुहम्मद अब्दुल्लाने (Muhammad Abdullah)केलेले सेलिब्रेशन सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाले आहे.


मुहम्मदने भारताच्या (India)गोलकीपरला चकवत गोल केला आणि आनंद व्यक्त करण्यासाठी मैदानाच्या एका कोपऱ्यात गेला. तिथे तो सहकाऱ्यांसोबत चहा पित आहे असा अविर्भाव करत या गोलचा आनंद साजरा केला. या त्याच्या कृतीचा संबंध २०१९ साली भारतीय पायलट अभिनंदन याने पाकिस्तानी सैन्याबरोबर चहापान केल्याच्या घटनेबरोबर करण्यात आला.

वायुदलाचे वैमानिक अभिनंदन (Abhinandan) यांना पाकिस्तानी सैन्याने पकडले होते आणि त्यांचा आदर राखत त्यांच्याबरोबर चहापान केले होते. त्यावेळी प्रसिद्ध झालेल्या व्हिडीओ सारखे मुहम्मदने सेलिब्रेशन केल्याने समाजमाध्यमावर हा वाद झाला आहे. अर्थात त्याने जरी सेलिब्रेशन केले असले तरी भारताने हा फुटबॉल सामना ३-२ ने जिंकला. या विजयामुळे भारताचे गटातील गुण ९ झाले आणि त्यांनी गटात अव्वल स्थान पटकावले. सेमी फायनलमध्ये भारताचा सामना नेपाळशी (Nepal)होणार आहे


हे देखील वाचा 

जामीन मिळाल्यावर कैद्यांसाठी केला ‘नागीण डान्स’; रिया चक्रवर्तीने सांगितला तुरुंगातील अनुभव

कमी किमतीत आता अधिक सुरक्षित कार! फक्त 5 लाखांच्या बजेटमध्ये लाँच झाली ‘ही’ जबरदस्त गाडी

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचा मोठा निर्णय; मायक्रोसॉफ्टऐवजी स्वदेशी ‘Zoho’ वापरणार, जाणून घ्या वैशिष्ट्ये

Web Title:
संबंधित बातम्या