Home / News / Public Money :जनतेच्या पैशातून नेत्यांचे पुतळे उभारता येणार नाहीत ! सुप्रीम कोर्टाने फटकारले

Public Money :जनतेच्या पैशातून नेत्यांचे पुतळे उभारता येणार नाहीत ! सुप्रीम कोर्टाने फटकारले

Public Money – माजी मुख्यमंत्री दिवंगत एम करुणानिधी (Former cm late M. Karunanidhi ) यांचा पुतळा (Build statues)उभारण्याच्या वादात सर्वोच्च...

By: Team Navakal
Supreme Court

Public Money – माजी मुख्यमंत्री दिवंगत एम करुणानिधी (Former cm late M. Karunanidhi ) यांचा पुतळा (Build statues)उभारण्याच्या वादात सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडू सरकारला चांगलेच फटकारले. जनतेच्या पैशातून राजकीय (Political)पुढाऱ्यांचे पुतळे उभारता येणार नाहीत, असे न्यायालयाने खडसावून सांगितले.


तामिळनाडू सरकारने (Tamil Nadu government) तिरुनेलवेल्ली जिल्ह्यात मुख्य रस्त्यावर असलेल्या वल्लीयूर भाजी मंडई परिसरात करुणानिधी यांचा ब्राँझ धातुचा पुतळा उभारण्याचा आणि मंडईच्या प्रवेशद्वारावरील कमानीवर करुणानिधी यांचे नाव लावण्याचा प्रस्ताव मांडला होता. हा मुद्दा मद्रास उच्च न्यायालयात (Madras High Court)गेला असता उच्च न्यायालयाने करुणानिधी यांचा पुतळा उभारण्यास परवानगी नाकारली होती.


मद्रास उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला तामिळनाडू सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या याचिकेवर न्या. विक्रम नाथ (Justices Vikram Nath)आणि न्या. प्रशांत कुमार मिश्रा (Prashant Kumar Mishra) यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्याप्रसंगी तुम्ही जनतेचा पैसा आपल्या नेत्याचे उदात्तीकरण करण्यासाठी का वापरता, असा सवाल न्यायालयाने केला. जनतेचा पैसा अशा कामांसाठी वापर करण्याचा अधिकार तुम्हाला नाही, अशा शब्दात न्यायालयाने सरकारला फटकारले.


हे देखील वाचा 

आसारामची सुरत येथील सरकारी रुग्णालयात पूजा!

क्रिकेटप्रमाणे पाकिस्तानच्या फुटबॉलपटूचे सेलिब्रेशनही वादात

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचा मोठा निर्णय; मायक्रोसॉफ्टऐवजी स्वदेशी ‘Zoho’ वापरणार, जाणून घ्या वैशिष्ट्ये

Web Title:
संबंधित बातम्या