Home / देश-विदेश / ‘युक्रेन गमवलेला संपूर्ण भूभाग रशियाकडून परत मिळवू शकतो’; डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी भविष्यवाणी

‘युक्रेन गमवलेला संपूर्ण भूभाग रशियाकडून परत मिळवू शकतो’; डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी भविष्यवाणी

Ukraine Russia War: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी युक्रेन-रशिया युद्धाबाबत एक मोठा दावा केला आहे. ट्रम्प यांनी युक्रेनचे...

By: Team Navakal
Ukraine Russia War

Ukraine Russia War: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी युक्रेन-रशिया युद्धाबाबत एक मोठा दावा केला आहे. ट्रम्प यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelenskyy) यांच्या भेटीनंतर युक्रेन आपला संपूर्ण भूभाग परत मिळवू शकतो, असा दावा त्यांनी केला.

ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’ (Truth Social) या झेलेन्स्की यांच्या भेटीनंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट लिहिली आहे. यात त्यांनी युरोपियन युनियन आणि नाटोच्या मदतीने युक्रेन रशियाकडून आपला संपूर्ण भूभाग परत मिळवू शकतो, असे म्हटले आहे.

रशियाला म्हणाले ‘पेपर टायगर’

ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, तीन वर्षांहून अधिक काळ चालवलेल्या या युद्धामुळे रशियाची ताकद नव्हे, तर कमकुवतपणाच समोर आला आहे.

“एखाद्या खऱ्या लष्करी शक्तीला हे युद्ध जिंकण्यासाठी एका आठवड्यापेक्षा कमी वेळ लागला असता,” असे म्हणत त्यांनी रशियाला ‘पेपर टायगर’म्हटले आहे.

ट्रम्प यांच्या मते, रशियामध्ये वाढलेल्या आर्थिक अडचणी, कमतरता आणि इंधनासाठी लागलेल्या लांब रांगांवरून त्यांची अर्थव्यवस्था संकटात असल्याचे स्पष्ट दिसते आहे.

“पुतिन आणि रशिया मोठ्या आर्थिक संकटात आहेत आणि हीच युक्रेनसाठी योग्य वेळ आहे,” असे ट्रम्प यांनी सांगितले.

‘NATO’ ला शस्त्र पुरवठा सुरूच राहणार

रशियाविरोधात कठोर भूमिका घेतल्यानंतरही ट्रम्प यांनी आपल्या पोस्टचा शेवट दोन्ही देशांना शुभेच्छा देऊन केला. त्यांनी म्हटले की, “आम्ही नाटोला शस्त्रे पुरवणे सुरूच ठेवू आणि त्यांना या शस्त्रांचा हवा तसा वापर करण्याची मुभा राहील. सर्वांना शुभेच्छा!”

यासोबतच त्यांनी रशियातील सामान्य जनतेला युद्धातील सत्य कळल्यास युक्रेन आपला देश परत मिळवू शकेल, असेही म्हटले आहे.

हे देखील वाचा –  पोलिसांनी अडवली फ्रेंच राष्ट्राध्यक्षांची गाडी, मॅक्रॉन यांनी थेट ट्रम्प यांना लावला फोन; व्हिडिओ व्हायरल

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या