Home / क्रीडा / Asia Cup 2025: आज India vs Bangladesh एकमेकांशी भिडणार; जाणून कधी व कुठे पाहता येईल सामना?

Asia Cup 2025: आज India vs Bangladesh एकमेकांशी भिडणार; जाणून कधी व कुठे पाहता येईल सामना?

India vs Bangladesh Asia Cup 2025: आशिया कप 2025 मध्ये आज (24 सप्टेंबर) भारतीय संघ बांगलादेशशी भिडणार आहे. याआधी सुपर-4...

By: Team Navakal
India vs Bangladesh Asia Cup 2025

India vs Bangladesh Asia Cup 2025: आशिया कप 2025 मध्ये आज (24 सप्टेंबर) भारतीय संघ बांगलादेशशी भिडणार आहे. याआधी सुपर-4 मध्ये दोन्ही संघांनी आपापले पहिले सामने जिंकले आहे. त्यामुळे हा सामना जिंकणारा संघ थेट आशिया कपच्या अंतिम फेरीत पोहोचणार आहे. हा दोन्ही संघांमध्ये झालेला 18 वा टी20 सामना असेल.

भारत विरुद्ध बांगलादेश: हेड टू हेड आकडेवारी

आजपर्यंत भारत आणि बांगलादेश यांच्यात 17 टी20 सामने खेळले गेले आहेत. यामध्ये भारतीय संघाचे वर्चस्व स्पष्ट दिसते, कारण भारताने 16 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे, तर बांगलादेशने फक्त 1 विजय मिळाला आहे.

या दोन संघांमध्ये शेवटचा सामना ऑक्टोबर 2024 मध्ये झाला होता. या सामन्यात सलामीवीर संजू सॅमसनने अवघ्या 47 चेंडूत 111 धावांची वादळी खेळी केली होती. सामन्यात भारताने 6 गडी गमावून 297 धावांचा डोंगर उभा केला होता. बांगलादेशला प्रत्युत्तरात 20 षटकांत 7 गडी गमावून 164 धावाच करता आल्या.

गेल्या 5 वर्षांतील भारतीय संघाची कामगिरी

गेल्या 5 वर्षांत भारतीय संघाची टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील कामगिरी अप्रतिम राहिली आहे. 2021 पासून भारताने 88 टी20 सामने खेळले असून, त्यापैकी फक्त 21 सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. 64 सामन्यांमध्ये विजय मिळवत भारतीय संघाने जवळपास 73% विजयाचे रेकॉर्ड कायम ठेवले आहे. याच काळात, भारताने बांगलादेशविरुद्ध खेळलेल्या 6 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.

Asia Cup 2025: भारत-बांगलादेश सामना कधी आणि कुठे पाहणार?

भारत विरुद्ध बांगलादेश सुपर 4 सामन्याचे थेट प्रक्षेपण SonyLIV ॲप आणि त्यांच्या वेबसाइटवर उपलब्ध असेल. याशिवाय, OTTplay ॲपवरही तुम्ही हा सामना पाहू शकता.

हा सामना टीव्हीवर थेट पाहण्यासाठी तुम्ही सोनी स्पोर्ट्स नेटवर्क (Sony Sports Network) वर ट्यून करू शकता. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरू होईल.

हे देखील वाचा –   ‘युक्रेन गमवलेला संपूर्ण भूभाग रशियाकडून परत मिळवू शकतो’; डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी भविष्यवाणी

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या