PhonePe IPO: वॉलमार्टच्या मालकीची डिजिटल पेमेंट्स आणि व्यावसायिक सेवा कंपनी फोनपे (PhonePe) ने आपल्या बहुप्रतिक्षित आयपीओसाठी (IPO) भारतीय बाजार नियामक सेबीकडे (SEBI) गोपनीय प्री-फायलिंग मार्गाने मसुदा दाखल केला आहे.
या आयपीओद्वारे कंपनी सुमारे 12,000 कोटी रुपये (1.35 अब्ज डॉलर) उभारण्याची योजना आखत आहे. ही संपूर्ण ऑफर फॉर सेल (OFS) असेल, ज्यामध्ये सुमारे 10% भागभांडवलाची विक्री केली जाईल.
हिस्सेदारी विक्री आणि मूल्यांकन
रिपोर्टनुसार, वॉलमार्ट, टायगर ग्लोबल (Tiger Global) आणि मायक्रोसॉफ्ट (Microsoft) आयपीओमध्ये आपली अंशतः हिस्सेदारी विकणारे प्रमुख भागधारक असतील. सध्या वॉलमार्टची कंपनीमध्ये बहुतांश हिस्सेदारी आहे.
याशिवाय, जनरल अटलांटिक, रिबिट कॅपिटल, टीव्हीएस कॅपिटल, टेनसेंट आणि कतार इन्वेस्टमेंट अथॉरिटीसारख्या गुंतवणूकदारांचाही कंपनीत सहभाग आहे.
कंपनीची कामगिरी आणि बाजारपेठ स्थिती
आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये फोनपेची कमाई वार्षिक आधारावर 40% नी वाढून 7,115 कोटी रुपये झाली. याच काळात, कंपनीने 1,202 कोटी रुपयांचा फ्री कॅश फ्लो (free cash flow) देखील नोंदवला आहे.
कंपनीचा EBITDA (ESOP खर्च वगळून) दुप्पट होऊन 1,477 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. करानंतरचा समायोजित नफा 220% नी वाढून 630 कोटी रुपये झाला. तसेच, कंपनीने प्रथमच 117 कोटी रुपयांचा समायोजित EBIT (ESOP खर्च वगळून) देखील नोंदवला आहे.
कंपनीच्या म्हणण्यानुसार, मार्च 2024 पर्यंत फोनपेकडे 53 कोटी नोंदणीकृत यूजर्स , 20 कोटी मासिक सक्रिय ग्राहक (monthly active users) आणि 50 लाखांपेक्षा जास्त पेमेंट डिव्हाइसेस आहेत.
दरमहा 770 कोटींपेक्षा जास्त व्यवहार (एकूण 10.5 लाख कोटी रुपये मूल्याचे) होतात. या व्यतिरिक्त, कंपनीने सिंगापूर, युएई, नेपाळ, श्रीलंका, भूतान आणि मॉरिशस यांसारख्या 6 देशांमध्ये भागीदारीद्वारे आंतरराष्ट्रीय यूपीआय पेमेंट सेवा सुरू केली आहे.
हे देखील वाचा – मराठवाड्याचे शेतकरी उद्ध्वस्त झाले ! पीक गेले! माती गेली! पुन्हा पावसाचा इशारा