Raj Thackeray Letter To Devendra Fadnavis: राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे (Rain) शेती आणि ग्रामीण भागाचे मोठे नुकसान झाले आहे. या अस्मानी संकटामुळे शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असून, त्यांना तातडीने मदतीची आवश्यकता आहे.
या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) आतापर्यंत 2,215 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. मात्र, प्रचलित निकषांमध्ये शिथिलता आणून शेतकऱ्यांना आणखी मदत दिली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली आहे. राज ठाकरेंनी देखील मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी केली आहे.
निकषांविना ‘ओला दुष्काळ’ जाहीर करा; राज ठाकरेंची मागणी
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत. त्यांनी पत्रात म्हटले आहे की, “मे महिन्याच्या मध्यापासून सुरू झालेल्या पावसाने उघडीप घेतलीच नाही, त्यामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे.” राज ठाकरे यांनी कुठल्याही निकषांच्या चौकटीत न अडकवता, सरसकट ‘ओला दुष्काळ’ (Wet Drought) जाहीर करण्याची मागणी केली आहे.
त्यांनी 7 ते 8 हजार रुपयांची तुटपुंजी मदत पुरेशी नसल्याचे सांगत, सरकारने एकरी किमान 30 ते 40 हजार रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे. कारण शेतकऱ्याला पुन्हा उभे राहण्यासाठी किमान एक वर्ष लागेल, असे त्यांनी नमूद केले.
प्रति,
— Raj Thackeray (@RajThackeray) September 24, 2025
श्री. देवेंद्र फडणवीस,
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य,
सस्नेह जय महाराष्ट्र,
महाराष्ट्रात अतिवृष्टीने जो धुमाकूळ घातला आहे, त्याबद्दल तुम्ही पूर्णपणे अवगत असालच. महाराष्ट्राचा असा कुठलाही भाग शिल्लक राहिलेला नसेल जिथे अतिवृष्टीने नुकसान केलं नसेल. आमच्या पक्षाच्या…
राज ठाकरेंच्या 5 प्रमुख मागण्या
1. कुठल्याही निकषांच्या चौकटीत न लावता, सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा. एकरी 7 आणि 8 हजार रुपये इतक्या तुटपुंजी नुकसान भरपाईने काहीही होणार नाही. त्याऐवजी एकरी किमान 30 हजार रुपये नुकसान भरपाई घोषित करा. कारण आता शेतकऱ्याची घडी बसायला किमान 1 वर्ष लागेल.
2. गेल्या काही वर्षातल्या बेफाम उधळपट्टीने, राज्याची आर्थिक स्थिती नाजूक झालेली असली तरी, सरकारने हात आखडता घेऊ नये. वेळेस केंद्राकडे पाठपुरावा करावा आणि मदतीचं पॅकेज केंद्राकडून मिळवावं. केंद्र सरकारने बिहारला असं पॅकेज या आधी दिलं आहेच, त्यामुळे महाराष्ट्राला द्यायला काही हरकत नसावी. आणि त्यासाठी दिल्लीचा जो काही पाठपुरावा करावा लागेल तो करावा. फक्त स्वतःच्या वैयक्तिक तक्रारींसाठी किंवा घटक पक्षातील संघर्षासाठी आम्ही दिल्लीत जातो असं चित्र न दिसता, सरकारमधले सगळे पक्ष राज्यासाठी पण दिल्लीत धाव घेतात हे पण राज्याला दिसू दे.
3. अशा आपत्तीचा पहिला फटका बसतो तो मुला-मुलींच्या शिक्षणाला. एकाही मुलाचं शिक्षण बंद होणार नाही. त्याला लागणारी वह्या-पुस्तकं मिळतील आणि अशा परिस्थितीत सहामाही परीक्षा देताना मुलांच्या मनाची काय स्थिती असेल याचा सरकारने विचार करून काही कृती तात्काळ करावी. हिंदी भाषा लादताना दाखवलेली चपळाई आणि आग्रहीपणा इथे पण दिसेल अशी अपेक्षा.
4. या अशा आपत्तीनंतर रोगराई प्रचंड वाढते त्यासाठी राज्याचा आरोग्य विभाग सतर्क राहील हे देखील सरकारने पहावं. जिल्हा रुग्णालयांपासून ते आरोग्य केंद्रांपर्यंत, सगळीकडे औषधांचा तुटवडा पडणार नाही हे सरकारने पहावं.
5. अशा संकटानंतर कर्जाच्या हप्त्यासाठी सुरु होणारा बँकांचा तगादा हा फारच तापदायक विषय असतो. एकतर बँकांना योग्य ती समज सरकारने आत्ताच द्यावी, अन्यथा आमचे महाराष्ट्र सैनिक ती देतीलच.
आदित्य ठाकरेंनीही केली कर्जमाफीची मागणी
याशिवाय, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून अतिवृष्टीग्रस्तांना तातडीची मदत आणि कर्जमाफी देण्याची मागणी केली आहे.
हे देखील वाचा – Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणी सुनावणी ९ ऑक्टोबरला