Home / देश-विदेश / रेल्वेच्या 10 लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांसाठी 78 दिवसांचा बोनस मंजूर; कोणाला मिळणार लाभ?

रेल्वेच्या 10 लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांसाठी 78 दिवसांचा बोनस मंजूर; कोणाला मिळणार लाभ?

Railway Employees Bonus: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये 10.91 लाख...

By: Team Navakal
Railway Employees Bonus

Railway Employees Bonus: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये 10.91 लाख नॉन-गॅझेटेड रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी 78 दिवसांच्या वेतनाएवढा प्रॉडक्टिव्हिटी-लिंक्ड बोनस (PLB) देण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

रेल्वे कर्मचाऱ्यांच्या बोनससाठी एकूण 1,865.68 कोटी रुपये खर्च येणार आहे. मोदी सरकारच्या या निर्णयामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.

रेल्वे कर्मचाऱ्यांना मिळणार 17,951 रुपयांपर्यंत बोनस

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी हा बोनस दरवर्षी दुर्गा पूजेच्या सुट्ट्यांपूर्वी दिला जातो. अधिकृत निवेदनानुसार, पात्र रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांच्या वेतनाएवढा, म्हणजेच 17,951 रुपयांपर्यंत बोनस मिळणार आहे. यंदा हा बोनस 10,91,146 रेल्वे कर्मचाऱ्यांना मिळेल.

या बोनसचा लाभ ट्रॅक मेंटेनर्स, लोको पायलट्स, ट्रेन मॅनेजर्स (गार्ड), स्टेशन मास्टर्स, सुपरवायझर्स, टेक्निशियन्स, टेक्निशियन हेल्पर्स, पॉइंट्समन, मिनिस्ट्रियल स्टाफ आणि इतर ग्रुप ‘सी’ कर्मचाऱ्यांसह विविध श्रेणीतील कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.

मागील वर्षी, केंद्रीय मंत्रिमंडळाने ऑक्टोबरमध्ये 11.72 लाख रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी 78 दिवसांच्या वेतनाएवढा बोनस मंजूर केला होता, ज्यासाठी एकूण 2,029 कोटी रुपये खर्च आला होता.

जहाजबांधणी आणि संशोधन क्षेत्रासाठी मोठे पॅकेजेस

केंद्रीय मंत्रिमंडळाने जहाजबांधणी आणि सागरी क्षेत्राच्या विकासासाठी 69,725 कोटी रुपयांचे मोठे पॅकेज मंजूर केले. या पॅकेजचा भाग असलेल्या ‘शिपबिल्डिंग फायनान्शिअल असिस्टन्स स्कीम’ (SBFAS) ला 31 मार्च 2036 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, ज्यासाठी एकूण 24,736 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध असेल.

याशिवाय, मंत्रिमंडळाने वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन विभाग (DSIR) योजनेसाठी एकूण 2,277.397 कोटी रुपयांची तरतूद मंजूर केली आहे. कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च (CSIR) द्वारे ही योजना देशातील सर्व R&D संस्था, राष्ट्रीय प्रयोगशाळा, राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्था आणि विद्यापीठांसाठी लागू केली जाईल.

हे देखील वाचा – अतिवृष्टीने शेतकरी उद्ध्वस्त, राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र; म्हणाले…

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या