Home / News / Nathuram Godse’s Photo on ST Bank Report : एसटी बँक अहवालावर नथुराम गोडसेचा फोटो

Nathuram Godse’s Photo on ST Bank Report : एसटी बँक अहवालावर नथुराम गोडसेचा फोटो

Nathuram Godse’s Photo on ST Bank Report – स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह म्हणजे एसटी (ST) बँकेचा 72 वा वार्षिक अहवाल नुकताच...

By: Team Navakal
Nathuram Godse's Photo on ST Bank Report


Nathuram Godse’s Photo on ST Bank Report – स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह म्हणजे एसटी (ST) बँकेचा 72 वा वार्षिक अहवाल नुकताच प्रकाशित करण्यात आला. या अहवालाच्या मुखपृष्ठावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj)शेजारी महात्मा गांधी (Mahatma Gandhi)यांची हत्या करणारा नथुराम गोडसे (Nathuram Godse) याचा फोटो छापला आहे.

यामुळे संताप पसरला आहे. दोन वर्षांपूर्वी  एसटी बँकेच्या निवडणुकीत ॲड. गुणरत्न सदावर्ते यांचे पॅनल निवडून आल्यापासून याप्रकारे गोडसेचे उदात्तिकरणाचे प्रकार त्यांच्याकडून वारंवार सुरू आहे.


दोन दिवसांपूर्वीच एसटी बँकेच्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन करण्यात आले आहे. अहवालाच्या मुखपृष्ठावर छत्रपती शिवाजी महाराज, नथुराम गोडसे, प्रभू श्रीरामचंद्र यांची छायाचित्रे आहेत. संपूर्ण अहवालात सदावर्ते यांचे एकूण 15 फोटो आहेत. काही फोटोत त्यांची पत्नी-मुलगीही आहे.

अहवालाच्या मुखपृष्ठावर बँकेच्या एटीएम कार्डचीदेखील जाहिरात असून या कार्डवरही कमळाच्या फुलाचे छायाचित्र आहे.
एसटी बँक निवडणुकीत ॲड. सदावर्ते पॅनल विजयी झाले, तेव्हाही त्यांच्या विजयी मिरवणुकीत नथुराम गोडसे यांचे फोटो झळकले होते.

त्यानंतर पहिल्या वर्षीच्या अहवालावरही नथुराम गोडसे यांचे फोटो छापले होते. यावर एसटी कामगार सेनेचे अध्यक्ष  संदीप शिंदे म्हणाले,  सदावर्तेसारख्या विकृत माणसाकडून दुसरी काय अपेक्षा करता येणार? प्रभू रामचंद्रांच्या सोबत एका खुन्याचा फोटो लावणे किती योग्य आहे?

शहाजी पाटील समितीने बँकेचा कोट्यवधींचा घोटाळा उघड करूनही या व्यक्तीवर कारवाई होत नाही. राष्ट्रवादी (शरद पवार) खा. अमर काळे म्हणाले की, हा अत्यंत घृणास्पद प्रकार आहे. हे विकृत मानसिकतेचे लक्षण आहे.


हे देखील वाचा –

मंत्र्यांना शेतकऱ्यांनी घेरले! अडवले, जाब विचारला ! मदतीच्या पिशव्यांवर शिंदेंचे फोटो पाहून संताप

मराठवाड्याचे शेतकरी उद्ध्वस्त झाले ! पीक गेले! माती गेली! पुन्हा पावसाचा इशारा

Web Title:
संबंधित बातम्या