Home / News / Air Force Was Denied in 1962 China War : चीनविरुद्धच्या युद्धात हवाई दलाला परवानगी नव्हती! सीडीएस अनिल चौहानांचा दावा

Air Force Was Denied in 1962 China War : चीनविरुद्धच्या युद्धात हवाई दलाला परवानगी नव्हती! सीडीएस अनिल चौहानांचा दावा

Air Force Denied in 1962 China War Air Force Was Denied in 1962 China War – आमच्या हवाई दलाला १९६२...

By: Team Navakal
Air Force Was Denied in 1962 China War

Air Force Denied in 1962 China War

Air Force Was Denied in 1962 China War – आमच्या हवाई दलाला १९६२ च्या भारत-पाकिस्तान युद्धात उतरण्याची परवानगी मिळाली नाही. अन्यथा चिनी आक्रमण बऱ्यापैकी रोखले जाऊ शकले असते, असा खळबळजनक दावा चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) अनिल चौहान यांनी केला आहे. ते पुण्यातील एका पुस्तक प्रकाशन समारंभाला संबोधित करताना बोलत होते.

दिवंगत लेफ्टनंट जनरल एस पी पी थोरात यांच्या फ्रॉम रेवेइल टू रिट्रीट या आत्मकथनाच्या सुधारित आवृत्तीचे प्रकाशन सीडीएस चौहान यांच्या हस्ते पुण्यात आले. या समारंभाला त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले.

ते म्हणाले की, हवाई दलामुळे सैन्यला तात्काळ हल्ला करण्याची आणि शत्रूवर दबाव टाकण्याची संधी मिळते. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. तेव्हा हवाई दलाच्या वापराला संघर्ष वाढीस कारणीभूत ठरवले जात होते. आता तसे होत नाही. ऑपरेशन सिंदूर हे याचे एक चपखल उदाहरण आहे.

चौहान यांनी युद्धनीतिबद्दल सांगितले की, १९६५ मध्ये लडाख आणि अरुणाचल प्रदेशमध्ये प्रतिस्पर्ध्याला स्वतःच्या प्रदेशातून मागे ढकलण्यासाठी आणि त्याचे आक्रमण थांबवण्यासाठी सीमेवर लष्करी चौकी उभारून पुढे सरसावण्याची फॉरवर्ड पॉलिसी एकसारखी नव्हती.

कारण दोन्ही प्रदेशांतली राजकीय आणि भौगोलिक परिस्थिती वेगवेगळी होती. लडाखवर चीनने आधीच ताबा मिळवला होता, तर ईशान्येत भारताची दावेदारी मजबूत होती.

दरम्यान, ६४ वर्षांच्या अनिल चौहान यांना केंद्र सरकारने कालच सीडीएसपदी आणखी आठ महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. ते आता ३० मे २०२६ पर्यंत सीडीएस म्हणून कार्यरत राहतील. सीडीएस पदासाठी ६५ वर्षांची वयोमर्यादा आहे. पण ही मर्यादा सरकार वाढवूही शकते.


हे देखील वाचा –

 उच्च पद मिळवण्यासाठी प्राध्यापकाने बनवले राष्ट्रीय पुरस्काराचे खोटे पत्र

व्हॉट्सॲपला ‘देसी’ पर्याय: शिक्षणमंत्र्यांनी केले ‘हे’ ॲप वापरण्याचे केले आवाहन

मंत्र्यांना शेतकऱ्यांनी घेरले! अडवले, जाब विचारला ! मदतीच्या पिशव्यांवर शिंदेंचे फोटो पाहून संताप

Web Title:
संबंधित बातम्या