Youth Scheme Amid Bihar Polls – बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पक्षांची जोरदार लगबग सुरू आहे. त्यात तरुणांना आकर्षित करण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीन कुमार (CM Nitish Kumar) वेगवेगळ्या योजना अंमलात आणत आहेत.
त्यांनी आता तरुणांसाठी रोजगाराभिमुख कौशल्य विकास प्रशिक्षण (training program)योजना सुरू केला आहे. ही योजना पाटणा येथील टूल रूम आणि प्रशिक्षण केंद्रात ६ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.
हे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत असणार आहे. प्रशिक्षण कालावधी ३ महिन्यांचा असेल, निवडलेले उमेदवार दररोज ८ तास वर्गात उपस्थित राहतील. दर्जेदार प्रशिक्षण सुनिश्चित करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रत्यक्ष शिक्षणावर विशेष भर दिला जाईल.
निवडलेल्या उमेदवारांना १,००० शुल्क आकारले जाईल, जे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर परत केले जाईल. संस्था प्रशिक्षणादरम्यान सर्व जेवणाची आणि राहण्याची सोय देखील प्रदान करणार आहे, जेणेकरून आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांनाही कोणत्याही अडथळ्याशिवाय प्रशिक्षण घेता येईल.
हे देखील वाचा –
चीनविरुद्धच्या युद्धात हवाई दलाला परवानगी नव्हती! सीडीएस अनिल चौहानांचा दावा
दिल्लीच्या नॅशनल म्युझियममधून ऐतिहासिक ‘डान्सिंग गर्ल’ प्रतिकृतीची चोरी
रेल्वेच्या 10 लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांसाठी 78 दिवसांचा बोनस मंजूर