Priya Kapoor – उद्योगपती आणि सोना कॉमस्टारचे माजी अध्यक्ष तसेच अभिनेत्री करिश्मा कपूरचे भूतपूर्व पती दिवंगत संजय कपूर (late Sanjay Kapoor)यांच्या निधनानंतर त्यांची तिसरी पत्नी प्रिया कपूरने दिल्ली उच्च न्यायलयात (Delhi High Court)अर्ज दाखल केला आहे. आपल्या अर्जात प्रियाने दिवंगत पतीची खाजगी संपत्ती सार्वजनिक न करण्याची मागणी केली असून, यासाठी गोपनीयता राखण्याबाबत करार करण्याची अट घातली आहे.
प्रियाने न्यायालयाला सांगितले की, करिश्मा कपूरची (Karisma Kapoor) मुले समायरा (Samaira)आणि कियान (Kiaan), दिवंगत संजय कपूर यांची आई राणी कपूर यांना संजय कपूर यांच्या संपूर्ण संपत्तीची माहिती हवी आहे . न्यायालयाने ही माहिती सादर करण्यास सांगितले आहे. मात्र ही माहिती सार्वजनिक होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी या सर्वांना प्रथम गोपनीयता करारावर स्वाक्षऱ्या कराव्या लागतील. हा करार सायबर सुरक्षा आणि इतर सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक आहे. मागील सुनावणीत न्यायालयाने प्रिया कपूर यांना दिवंगत पतीच्या संपत्तीचे तपशील सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यावर उत्तर देताना प्रियाने सांगितले की ती ही माहिती न्यायालयात देण्यास तयार आहे, पण ती सीलबंद लिफाफ्यात सादर केली जाईल आणि ती माहिती फक्त गोपनीयता करारावर स्वाक्षरी करणाऱ्यांनाच पाहता येईल.
उद्योगपती संजय कपूर यांचे १२ जून २०२५ रोजी ब्रिटनमध्ये पोलो खेळताना निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या संपत्तीवरून कुटुंबात वाद उफाळला आहे. प्रिया कपूर यांनी दावा केला आहे की, संजय कपूर यांचे इच्छापत्र वैध असून, करिश्मा कपूरची मुले समायरा आणि कियान यांना यापूर्वीच सुमारे १,९०० कोटी रुपयांची संपत्ती त्यांनी दिलेली आहे.
हे देखील वाचा –
जीएसटीबाबत विरोधी पक्षदिशाभूल करतात! मोदींची टीका
चीनविरुद्धच्या युद्धात हवाई दलाला परवानगी नव्हती! सीडीएस अनिल चौहानांचा दावा
डिकी बर्ड: पंचगिरीतील ‘लेजेन्ड’! भारतीय संघाच्या 1983 विश्वचषक विजयाचे होते साक्षीदार