Crude oil from Russia-आम्ही भारताला दंडित करू इच्छित नाही, तर आम्हाला युक्रेन युद्ध संपवायचे आहे. त्यामुळे भारताने रशियाऐवजी Crude oil from Russia दुसऱ्या कोणत्याही देशाकडून तेल खरेदी केली तर चालेल, अशी मागणीवजा भूमिका अमेरिकेने स्पष्ट केली आहे. अमेरिकेचे ऊर्जामंत्री क्रिस राईट यांनी आवाहन केले की, रशियाकडून कच्चे तेल आयात करण्याबद्दल भारताने फेरविचार करावा.
न्यूयॉर्क येथील पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, केवळ रशिया सोडून तुम्ही जगातल्या कोणत्याही देशाकडून तेल खरेदी करू शकते. अमेरिकेसोबतच इतर देशही तेल विक्री करतात. आम्हाला भारताला दंडीत करायचे नाही, तर युक्रेन युद्ध संपवायचे आहे. डोनाल्ड ट्म्प यांनाही हे युद्ध लवकर संपवायचे आहे. यासाठी भारताने आमच्या खांद्याला खांदा लावून काम करावे. तेल विक्रीतून मिळणाऱ्या पैशातून रशिया दर आठवड्याला युक्रेनमधील हजारो लोकांना मारून टाकत आहे.
राईट यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्यासोबत अलीकडेच अमेरिकेत झालेल्या भेटीत सकारात्मक चर्चा झाल्याचेही सांगितले.
——————————————————————————————————————————————————
हे देखील वाचा –
क्रिकेटप्रमाणे पाकिस्तानच्या फुटबॉलपटूचे सेलिब्रेशनही वादात
भंडाऱ्यात बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू