Draupadi Murmu: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) त्यांच्या कुटुंबासह आज देवदर्शनासाठी मथुरा आणि वृंदावन (Vrindavan)च्या दौर्यावर आल्या होत्या. त्यांनी निधिवनराज (Nidhivanraj) मंदिर, बांके बिहारी (Banke Bihari) मंदिर, बंशी चोर राधा राणी मंदिर (Banshee Chor Radha Rani) आणि हरिदास (Haridas) मंदिराला भेट देऊन पूजा अर्चना केली. त्यांच्या या दौर्यामुळे वृंदावनमध्ये २४ आणि मथुरामधील २३ मार्ग सकाळी ७ वाजल्यापासून बंद ठेवण्यात आले होते. या मार्गांवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
वृंदावन रोड रेल्वे स्टेशनवर आज सकाळी १० वाजता मुलगी-जावई, नातूसह द्रौपदी मुर्मू पोहोचल्या. त्यावेळी कॅबिनेट मंत्री लक्ष्मी नारायण चौधरी, महापौर विनोद अग्रवाल, आग्रा झोनचे अतिरिक्त पुलिस महानिदेशक अनुपमा कुलश्रेष्ठ, आयुक्त शैलेंद्र सिंह यांनी त्यांचे स्वागत केले.
त्यानंतर द्रौपदी मुर्मू गोल्फ कार्टमधून बसून बांके बिहारी मंदिर परिसरात पोहोचल्या आणि या मंदिरात पूजा-अर्चना केली. त्यासोबत या मंदिराच्या उंबरठ्याची पूजा करून गिर गायीच्या तुपाने चांदीचा दिवा प्रज्वलित केला. यादरम्यान मंदिराभोवती कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती.
त्यानंतर निधीवनराज मंदिराला अर्धा तास प्रदक्षिणा घातल्यानंतर त्या बंशी चोर राधा राणी मंदिरात पोहोचल्या. मग त्यांनी हरिदास मंदिरालाही भेट दिली. येथे त्यांनी अलंकार अर्पण केले.
हे देखील वाचा –