India-Pak War Lessons : पाकिस्तानने (Pakistan) मे महिन्यात भारता (India) सोबत झालेल्या चार दिवसांच्या हवाई संघर्षाची कहाणी शालेय (School) मुलांना शिकवण्याचा घाट घातला आहे. भारताच्या हवाई हल्ल्यात चार दिवसांतच पाकिस्तानने माघार घेतली होती. आता विजय कथा म्हणून या संघर्षाचा धडा शालेय अभ्यासक्रमात सामील केला आहे.
पाकिस्तानी पाठ्यपुस्तकांमध्ये म्हटले आहे की भारताने पहलगाम (Pahalgam Attack)दहशतवादी हल्ल्याचा पाकिस्तानवर खोटा आरोप केला आहे . ७ मे २०२५ रोजी युद्ध छेडल्याचा दावा केला आहे.
या धड्यामध्ये म्हटले आहे की ऑपरेशन बनयान-उन-मर्सूस अंतर्गत पाक हवाई दलाने भारताची २६ लष्करी ठिकाणे आणि हवाई तळ नष्ट केले. ४ राफेल जेट पाडल्याचाही दावा केला आहे.
मोठ्या नुकसानीनंतर भारताने युद्धबंदीची भीक मागितली आणि अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीने युद्धबंदी झाल्याचा दावाही करण्यात आला आहे. भारताने हा दावा वेळोवेळी खोडून काढला आहे.
हे देखील वाचा –
निधिवनराज, बांके बिहारी मंदिरांना राष्ट्रपतींची भेट; अर्धा तास प्रदक्षिणा