Home / News / Toll Money to Gadkari’s Sons: Damania : टोलचा पैसा गडकरींच्या दोन्ही मुलांना मिळतो 128 कंपन्यांचा तपशील देईन! दमानियांचा आरोप

Toll Money to Gadkari’s Sons: Damania : टोलचा पैसा गडकरींच्या दोन्ही मुलांना मिळतो 128 कंपन्यांचा तपशील देईन! दमानियांचा आरोप

Toll Money to Gadkari’s Sons: Damania – केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री व भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी (Nitin Gadkari)यांच्यावर अलिकडेच...

By: Team Navakal
Toll Money to Gadkari’s Sons: Damania


Toll Money to Gadkari’s Sons: Damania
– केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री व भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी (Nitin Gadkari)यांच्यावर अलिकडेच इथनॉल प्रकरणात स्वतःच्या मुलांचा फायदा करून दिल्याचा आरोप सतत होत असतानाच आता त्यांनी निखिल व सारंग या दोन्ही मुलांच्या कंपनीत टोल वसुलीचे पैसे थेट  हस्तांतरित  होतात, असा आरोप आज सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी केला.

मुंबईच्या भांडूप परिसरातील एका वादग्रस्त रिअल इस्टेट (Real Estate) प्रकल्पापासून सुरुवात होणारा हा वाद आता बँक घोटाळा, इन्सॉल्व्हन्सी अँड बँकरप्सी कोडचे उल्लंघन आणि राजकीय हस्तक्षेपापर्यंत पोहोचला आहे, असेही दमानिया म्हणाल्या.


मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूर परिस्थिती लक्षात घेऊन दमानिया यांनी काल पत्रकार परिषद रद्द केली होती. आज त्यांनी पत्रकार परिषद घेत आरोप केला की, ज्यांना ‌‘एक्स्प्रेस वे मॅन ऑफ इंडिया‌’ म्हटले जाते ते नितीन गडकरी प्रत्येक किलोमीटर रस्त्याच्या कामामागे आणि टोलमध्ये पैसे खात आहेत. त्यांच्या 128 कंपन्यांचे आर्थिक व्यवहार योग्य वेळी उघड करीन, असाही इशारा दमानिया यांनी दिला आहे.


अंजली दमानिया म्हणाल्या की, मुंबईच्या भांडूप परिसरातील स्थानिक रहिवाशांच्या मालकीची जमीन संशयास्पद व्यवहाराद्वारे एका व्यक्तीला विकण्यात आली. यासाठी गडकरी यांनी थेट हस्तक्षेप केला आणि फोन करून प्रशासनावर दबाव  टाकला. त्यानंतर ही जमीन मोकळी करून घेण्यासाठी जमीन विकास प्राधिकरण आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांच्या आदेशांमध्ये फेरफार करून जमिनीवरील बेकायदेशीर बांधकाम तोडण्याचा आता आदेश काढण्यात आला आहे. याबाबत मी सुनील राऊत, उबाठा खासदार संजय राऊत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गडकरींची भेट घेतली होती. पण काही झाले नाही.


पुढे त्या म्हणाल्या की, गेल्या काही दिवसांपासून इथेनॉल मिश्रित इंधन अर्थात ई-20  पेट्रोलची चर्चा सुरू आहे. सरकारने सर्व पेट्रोल पंपांवर इथेनॉल मिश्रित पेट्रोल विक्री अनिवार्य केली आहे. सरकारचा हा निर्णय गडकरींच्या दोन्ही मुलांच्या कंपन्यांना इथेनॉल निर्मितीचा फायदा करून देत आहे.  गडकरी यांचे निकटवर्ती कुटुंबांच्या कंपन्यांच्या नावावर पायाभूत सुविधा, टोलवसुली व ऊर्जा प्रकल्प सुरू आहेत. त्यातील आयडीएल नावाच्या कंपनीत गडकरी पुत्र निखील गडकरी 17 मार्च 2008 पासून जोडलेले आहेत.

या कंपनीला टोलमधून मिळालेला पैसा गडकरींच्या मुलांच्या कंपन्यांमध्ये हस्तांतरित होतो. शिवाय निखिलशी संबंधित इतर कंपन्यांनी कॅनरा बँक, कॉर्पोरेशन बँक, बँक ऑफ बडोदा व युनियन बँक यांसह विविध बँकांकडून तब्बल 3,188 कोटींचे कर्ज घेतले होते. परंतु त्याचे सेटलमेंट फक्त 299 कोटींमध्ये करण्यात आले. म्हणजेच एकूण रकमेच्या अवघ्या 10 टक्क्यांत प्रकरण मिटवून टाकण्यात आले. नियमानुसार दिवाळखोर कंपन्यांचे संचालक नव्या व्यवसायांत सहभागी होऊ शकत नाहीत.

मात्र गडकरी कुटुंबियांनी दिवाळखोर कंपन्यांच्या मालमत्तेसाठी नव्या कंपन्या स्थापन करून त्यांचे संचालन सुरूच ठेवले आहे. जे कायद्याचे उल्लंघन आहे. त्यासाठी त्यांना तुरुंगवास होऊ शकतो. माझ्याकडे  गडकरींच्या दोन मुलांच्या 128 कंपन्यांचे तपशील आहेत. या संदर्भातील आर्थिक व्यवहार हाती आले आहेत. योग्य वेळी ते उघड करीन.


इतके ठोस पुरावे असताना अंमलबजावणी संचलनालय (ईडी) आणि सीबीआयसारख्या तपास यंत्रणा कारवाई
करत नाहीत. नितीन गडकरी म्हणतात की, त्यांना पैशांची गरज नाही. कारण त्यांच्याकडे पुरेसे पैसे आहेत. ते म्हणतात की, त्यांच्या मेंदूचं मूल्य दर महिन्याला 200 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला त्यावर दमानिया म्हणाल्या की,  खरंतर त्यांनी स्वतःला खूप कमी लेखले आहे. कारण गडकरींचे पुत्र दररोज 144 कोटी रुपयांनी श्रीमंत होत आहेत.


अंजली दमानिया यांच्या आरोपांवर भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी नितीन गडकरींना बदनाम करण्यासाठी असे बेछूट आरोप केले जात आहेत, असा पलटवार केला. केशव उपाध्ये म्हणाले की, 2013 सालीही असेच आरोप झाले होते आणि त्यावेळी काँग्रेसच्या यंत्रणांनी चौकशी केली होती. परंतु काहीही तथ्य आढळले नाही. केवळ बदनामी करण्यासाठी आरोप केले जात आहेत. गडकरींवरील आरोप तथ्य नसलेले, खोटे आणि जुने आरोप आहेत. खरे तर न्यायालयात जावून याला चॅलेंज केले जाऊ शकते. पण काही लोक न्यायालयात जात नाहीत. 


हे देखील वाचा –

संजय कपूरांच्या संपत्तीचा वाद ; प्रिया कपूरचा गोपनीयतेचा आग्रह ! हायकोर्टात अर्ज

मला ट्रोल करणाऱ्या लोकांना…’; अमृता फडणवीस यांचे ट्रोलर्सला सडेतोड उत्तर

सर्वसमावेशकतेचे सर्व रंग काँग्रेसचं भविष्य उजळवणार?

Web Title:
संबंधित बातम्या