Donald Trump Tariffs: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा देशांतर्गत उत्पादन क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी जगभरातील वस्तूंवर मोठे आयात शुल्क लागू करण्याची घोषणा केली आहे. त्यांनी फार्मास्युटिकल औषधांपासून ते किचन कॅबिनेट पर्यंतच्या वस्तूंवर 100 टक्क्यांपर्यंत शुल्क लादले जाईल, असे जाहीर केले. हे नवीन शुल्क 1 ऑक्टोबर पासून लागू होणार आहे.
ट्रुथ सोशल (Truth Social) या त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, “जोपर्यंत औषध कंपन्या अमेरिकेत नवीन प्रकल्प उभारत नाहीत, तोपर्यंत आम्ही त्यांच्या उत्पादनांवर 100 टक्के आयात कर लावू. कंपनीने पायाभरणी केलेली असेल किंवा प्रकल्प बांधकाम सुरू असेल, तरच सूट मिळेल. याला कोणताही अपवाद नसेल.”
आता अमेरिकेबाहेर बनवलेल्या ब्रँडेड औषधांवर 100 टक्के टॅरिफ आकारला जाणार आहे. मात्र, जेनेरिक औषधांवर कोणताही कर आकारला जाणार आहे. भारत अमेरिकेले मोठ्या प्रमाणात जेनेरिक औषधांची निर्यात करतो. तर ब्रँडेड औषधांची निर्यात कमी आहे. त्यामुळे या निर्णयाचा काहीसा परिणाम भारतावरही होऊ शकतो.
या उत्पादनांवरही आयात शुल्क वाढले
ट्रम्प यांच्या या नवीन टॅरिफ धोरणात अनेक उत्पादनांचा समावेश आहे, ज्यामुळे परदेशी उत्पादकांवर मोठा दबाव येणार आहे:
- किचन कॅबिनेट आणि बाथरुम व्हॅनिटीज: 50 टक्के शुल्क.
- अपहोल्स्टर्ड फर्निचर: 30 टक्के शुल्क.
- जड ट्रक आणि सुटे भाग: 25 टक्के शुल्क.
या वाढीव शुल्कामागचे कारण स्पष्ट करताना ट्रम्प म्हणाले, “फर्निचर आणि कॅबिनेटरी परदेशातून अमेरिकेत मोठ्या प्रमाणात येत आहेत. जड ट्रक आणि त्यांचे भाग आपल्या देशांतर्गत उत्पादकांना नुकसान पोहोचवत आहेत. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा आणि इतर कारणांसाठी हे शुल्क आवश्यक आहे.”
महागाई वाढण्याचा धोका
मागील काही आठवड्यांपूर्वी जाहीर झालेल्या व्यापार नियमांनंतर ट्रम्प यांनी हे शुल्क लादले आहे. ट्रम्प यांना विश्वास आहे की, या शुल्कामुळे देशांतर्गत उत्पादन वाढेल आणि सरकारी तूट कमी होईल.
हे देखील वाचा – ‘बाबरी मशीद बांधणे हेच ‘मूळ अपवित्रतेचे कृत्य’; माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांचे मोठे विधान