Home / arthmitra / UIDAI चे नवीन ॲप लवकरच; आता घरी बसून बदला आधार कार्डवरील माहिती

UIDAI चे नवीन ॲप लवकरच; आता घरी बसून बदला आधार कार्डवरील माहिती

Aadhaar Online Update: नागरिकांसाठी आधार कार्ड (Aadhaar Card) संबंधित सेवा अधिक सुलभ करण्यासाठी केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. युनिक...

By: Team Navakal
Aadhaar Online Update

Aadhaar Online Update: नागरिकांसाठी आधार कार्ड (Aadhaar Card) संबंधित सेवा अधिक सुलभ करण्यासाठी केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) लवकरच एक नवीन मोबाइल ॲप्लिकेशन (Mobile Application) लॉन्च करणार आहे, ज्यामुळे आधार कार्डधारक आपली महत्त्वाची माहिती घरी बसून अपडेट करू शकतील.

ॲपमध्ये कोणती माहिती अपडेट करता येईल?

सध्या आधारमध्ये कोणताही बदल करायचा झाल्यास आधार सेवा केंद्रात जावे लागते. मात्र, नवीन ॲप लॉन्च झाल्यानंतर आधाररवरील माहिती सहज बदलता येईल. ॲपच्या मदतीने नाव, पत्ता, जन्मतारखेसह अनेक इतर माहिती बदलणे शक्य होईल.

हे ॲप या वर्षाच्या अखेरीस लॉन्च होण्याची शक्यता आहे.

सुरक्षिततेसाठी Face ID आणि AI चा वापर

UIDAI ने हे ॲप सुरक्षित सेवा देण्यासाठी डिझाइन केले आहे. यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि Face ID तंत्रज्ञानाचा समावेश केला जाईल. यामुळे आधार वापरकर्त्यांना सुरक्षित डिजिटल सेवा मिळतील.

नोव्हेंबर महिन्यापासून आधार केंद्रात जाण्याची गरज फक्त बायोमेट्रिक प्रमाणीकरण, जसे की फिंगरप्रिंट आणि आयरीस स्कॅनिंग साठीच असेल. या नवीन उपायामुळे कागदपत्रांची गरज कमी होईल, ओळखपत्र फसवणुकीचा धोका कमी होईल आणि संपूर्ण प्रक्रिया जलद होईल.

नवीन ॲपची इतर खास वैशिष्ट्ये

आधार अपडेटची प्रक्रिया अधिक सोपी करण्यासाठी, UIDAI इतर सरकारी स्रोतांकडून यूजर्सचा डेटा आपोआप घेण्याची योजना आखत आहे. यासाठी खालील कागदपत्रे डिजिटली लिंक केली जातील:

  • जन्म प्रमाणपत्र (Birth Certificates)
  • पॅन कार्ड (PAN Card)
  • पासपोर्ट (Passport)
  • ड्रायव्हिंग लायसन्स (Driving Licenses)
  • रेशन कार्ड (Ration Card) (PDS कडून)
  • मनरेगा (MNREGA) नोंदी
  • पत्याच्या पडताळणीसाठी वीज बिलाचा तपशील (Electricity Bill Details)

हे देखील वाचा – Ajit Pawar : ‘आम्ही काय इथं गोट्या खेळायला आलोय का?’; पूरग्रस्तांसमोर कर्जमाफीचा प्रश्न येताच अजित पवार संतापले

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या