BMC – उच्च न्यायालयाने (Mumbai High Court)कबुतरांना खाद्य देण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासनाला (Mumbai Municipal Corporation) जागा सुचवण्याचे आदेश दिले आहेत.या आदेशानुसार पालिकेने कबुतरखान्यांसाठी जागा (Pigeon Spaces ) शोधण्याचे काम सुरू केले आहे.त्यात आतापर्यंत २५ प्रभागांपैकी पूर्व उपनगरातील १२ प्रभागांतील १३ ठिकाणे निश्चित केली आहेत.तर पश्चिम उपनगर आणि दक्षिण मुंबईत जागेचा शोध सुरू आहे.
मुंबईतील २५ पैकी १२ प्रभागांत १३ ठिकाणी नवीन कबुतरखाने तयार करण्याचा अहवाल महापालिकेला सादर झाला आहे.उर्वरीत १३ प्रभागांत जागाच उपलब्ध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यात ९ मुंबई शहरातील तर ४ उपनगरातील प्रभाग आहेत.मुंबई शहरात लोकवस्तीपासून ५०० मीटर किंवा त्याहून अधिक अंतरावर नवे कबुतरखाने सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत.मुंबईत गेल्या काही महिन्यांपासून कबुतरखान्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. पालिकेने कबुतरांना नियंत्रित पद्धतीने खाद्य पुरवावे किंवा कसे यावर हरकती, सूचना मागवल्या आहेत.
मुंबईतील कबुतरखान्यांमुळे नागरिकांच्या आरोग्याच्या (Public health concerns) समस्या निर्माण झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने पालिकेला कबुतरखाने बंद करण्याचे निर्देश दिले होते.त्यामुळे पालिकेने न कबुतरखाने बंद करण्याची मोहीम सुरू केली केली.परंतु त्याला जैन समाजाने विरोध केला.यावर न्यायालयाने कबुतरांना खाद्य देण्यासाठी प्रशासनाला जागा सुचवण्याचे आदेश दिले आहेत
हे देखील वाचा –
नवरात्रीचे राजकीय’ रंग ! शिवसेना: रंग भगवाच, पण कशा बदलणार छटा?
नवरात्रीचे राजकीय नवरंग ! राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संभ्रमाचे राजकारण