Pradeep Sharma – एन्काऊंटर स्पेशलिस्ट (Encounter specialist)प्रदीप शर्मा यांनी आज सकाळी शिवतिर्थावर येऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली. त्यांच्यावर अब तक ११२ हा चित्रपट चित्रित झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि ठाण्याचे मनसे नेते अभिजीत पानसे आहेत.
प्रदीप शर्मा यांनी हितेंद्र ठाकूर यांच्या विरोधात २०१९ मध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाकडून नालासोपारा विधानसभा मतदारसंघातून (Nalasopara Assembly) निवडणूक लढवली होती. मात्र त्यात त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर झालेल्या अँटिलिया स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणांत पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यानंतर प्रदीप शर्माला अटक करण्यात आली होती.
याच प्रकरणात काही काळ त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ऑगस्ट २०२३ मध्ये त्यांना जामीन दिला. २०२४ मध्ये त्यांच्या पत्नी स्वीकृती शर्मा(Swikruti Sharma) यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. स्वीकृती यांना अंधेरी पूर्व विधानसभा (Andheri East Assembly)मंतदारसंघातून निवडणूक लढवायची होती. मात्र त्यांना तिकीट न मिळाल्याने त्या नाराज झाल्या. त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली.
हे देखील वाचा –
गावित भगिनींची संचित रजा नामंजूर; उच्च न्यायालयानेही मागणी फेटाळली
मुंबईत कबुतरखान्यांसाठी जागा शोधण्याचे काम सुरू ! १३ ठिकाणे निश्चित केली
संजय कपूरांच्या संपत्तीचा वाद ; प्रिया कपूरचा गोपनीयतेचा आग्रह ! हायकोर्टात अर्ज