Lookout Notice – भारतीय प्रशासकीय सेवेतील बडतर्फ अधिकारी पूजा खेडकर (IAS officer Pooja Khedkar.)यांच्या पुण्यातील घरातून नवी मुंबईत अपहरण झालेला ट्रक हेल्पर सापडल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणात आता पूजाचे फरार वडील दिलीप खेडकर (Dilip Khedkar) आणि आई मनोरमा खेडकर (Manorama Khedkar.)यांच्याविरोधात नवी मुंबई पोलिसांनी लुकआऊट नोटीस काढली आहे.
काही दिवसांपूर्वी मुलुंड–ऐरोली (Mulund–Airoli) मार्गावर सिमेंट मिक्सर ट्रक आणि कारची धडक झाली होती. ट्रकमध्ये चालक चंदकुमार चव्हाण व हेल्पर प्रल्हाद कुमार होते, तर कारमध्ये दोन अज्ञात व्यक्ती होते. अपघातानंतर (Accident)झालेल्या वादात कारमधील दोघांनी हेल्पर प्रल्हाद कुमार याला जबरदस्तीने कारमध्ये बसवून नेले आणि ट्रक मागे आणण्यास सांगितले. काही अंतरावर कार नजरेआड झाली.
या घटनेनंतर रबाळे पोलिस ठाण्यात अपहरणाची (kidnapping)तक्रार दाखल करण्यात आली. तपासादरम्यान संबंधित कार पुण्यातील पूजा खेडकर यांच्या घरात असल्याचे उघड झाले. पोलिसांनी तेथे छापा टाकून हेल्परची सुटका केली होती. दरम्यान, मागील आठवड्यात दिलीप खेडकरचा चालक प्रफुल्ल साळुंखे याला पोलिसांनी अटक केली होती. मात्र, खेडकर आणि त्यांची पत्नी मनोरमा फरार असल्याने त्यांच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे.
हे देखील वाचा –
गावित भगिनींची संचित रजा नामंजूर; उच्च न्यायालयानेही मागणी फेटाळली