Shah’s Durga Puja at WB : ममतांच्या अंगणात अमित शहा दुर्गा पूजा देखाव्याचे उद्घाटन!
Shah’s Durga Puja at WB – पुढच्या वर्षी होणार्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shaha)आज सकाळी पश्चिम बंगालची राजधानी कोलकात्यामध्ये दाखल झाले. येथील संतोष मित्र स्क्वेअर दुर्गा पूजा देखाव्याचे उद्घाटन केल्यानंतर त्यांनी माँ दुर्गा देवीची (Durga Puja)पूजाही केली. त्यानंतर शहांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banrjee)राहत असलेल्या कालीघाट परिसरातील मंदिराला भेट दिली.
शहा यांनी ईस्टर्न झोनल कल्चरल सेंटरमधील भाजपाच्या दुर्गा पूजा देखाव्याचे उद्घाटन केले. यंदा दुर्गा पूजा देखाव्याची थीम ‘ऑपरेशन सिंदूर’ आहे. त्याद्वारे भारतीय लष्काराच्या शौर्य आणि बलिदानाला श्रद्धांजली वाहिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, विंग कमांडर व्योमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेशी यासारख्या प्रमुख लष्करी व्यक्तींचे फोटोही देखाव्यात आहेत. याचे देशभक्तीने प्रेरित श्रद्धांजली असे वर्णन करण्यात आले आहे.
या उद्घाटनानंतर शहांनी एक्सवर पोस्ट केले की, नवरात्रीच्या काळात पश्चिम बंगालमध्ये एक विशेष ऊर्जा आणि आनंद पसरतो. आज कोलकाता येथे मी संतोष मित्र स्क्वेअर दुर्गा पूजा देखाव्याचे उद्घाटन केले आणि माँ दुर्गाला प्रार्थना केली.
तिच्या आशीर्वादाने सर्वांचे कल्याण होवो. पश्चिम बंगालचे दुर्गा देखावे असोत किंवा गुजरातचे गरबा रास, संपूर्ण देश मोठ्या उत्साहाने देवीच्या पूजेचा उत्सव साजरा करत आहे.
हे देखील वाचा –
खेडकर पती-पत्नीविरोधात पोलिसांची लुकआऊट नोटीस
बोनस २ हजार रूपयांची भाऊबीज ! तटकरेंची माहिती
गावित भगिनींची संचित रजा नामंजूर; उच्च न्यायालयानेही मागणी फेटाळली