Welcome New Cheetahs: दक्षिण आफ्रिकेतील (South Africa) चित्त्यांना भारताचे हवामान (India weather) चांगलेच मानवले आहे. त्यांचे संंगोपन आणि संवर्धन देखील होत आहे.या पार्श्वभूमीवर डिसेंबर महिन्यात आणखी ८ ते १० चित्ते आणण्याची योजना सरकारने आखली आहे, अशी माहिती पर्यावरण खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली.
आठ ते दहा चित्त्यांचा गट दक्षिण आफ्रिकेच्या बोस्तवाना (Botswana) किंवा नामिबिया (Namibia) या देशातून भारतात आणला जाणार आहे. बोस्तवाना,नामिबिया आणि केनिया (Kenya) या तीन देशांच्या सरकारसोबत भारत सरकारची चर्चा सुरू आहे.कारण पुढील वर्षी केनियातूनही भारतात ८ ते १० चित्ते येण्याची शक्यता आहे.
मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात चित्त्यांचे संवर्धन केले जात आहेत. त्यामुळे भारतातून एकेकाळी नामशेष झालेला चित्ता आता पुन्हा बागडू लागला आहे. आता डिसेंबरमध्ये बोस्तवाना किंवा नामेबियातूनही ८ ते १० चित्ते आणण्याचा विचार सुरू आहे. सप्टेंबर २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कुनो राष्ट्रीय उद्यानात नामेबियातून आणलेले चित्ते सोडले होते. फेब्रुवारी २०२३ मध्ये दक्षिण आफ्रिकेतून आणखी चित्ते आणले. सध्या २७ चित्ते आहेत. त्यामध्ये भारतात जन्म घेतलेल्या चित्त्यांची संख्या १६ आहे.
हे देखील वाचा –
खेडकर पती-पत्नीविरोधात पोलिसांची लुकआऊट नोटीस