Wangchuk Arrested ; Leh Violence – लडाख राज्य मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. या आंदोलनात चार लोकांचा मृत्यू झाला आणि ७० हून अधिक लोक जखमी झाले. त्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यातर्गत (एनएसए) सामाजिक कार्यकर्ता सोनम वांगचुक यांना आज अटक केली.
गृहमंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे की, १० सप्टेंबर रोजी सोनम वांगचुक (Sonam Wangchuk )यांनी लडाखसाठी सहावी अनुसूची आणि स्वतंत्र राज्य मागणीसाठी उपोषण सुरू केले. मात्र यादरम्यान वांगचुक यांनी अरब स्प्रिंग आणि नेपाळ जनरेशन झेडच्या आंदोलनांचा उल्लेख केल्यामुळे जमाव भडकला.
जमावाने लेहमधील स्थानिक भाजपा कार्यालय आणि काही सरकारी वाहने जाळली. या विधानांमुळे वातावरण हिंसक झाले. त्यानंतर त्यांनी उपोषण सोडले. परंतु शांतता प्रस्थापित करण्याची जबाबदारी न घेता अॅम्ब्युलन्समधून त्यांच्या गावी रवाना झाले. सरकार लडाखमधील जनतेला संविधानिक संरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे.
काल सरकारने वांगचुक यांच्या ‘एसईसीएमओएल’ या संस्थेचा परकीय निधी प्राप्त करण्याचा परवाना रद्द केला. यासाठी गृह मंत्रालयाने परकीय योगदान नियमन कायदा (एफसीआरए ) अंतर्गत नियम अनेक उल्लंघन केल्याचा आरोप केला. दरम्यान सोनम वांगचुक सर्व आरोप फेटाळत म्हणाले की, ही परिस्थिती माझ्यामुळे किंवा काँग्रेसमुळे झाली, असे म्हणणे म्हणजे मूळ समस्यांकडे दुर्लक्ष करून बळीचा बकरा शोधण्याचा प्रयत्न आहे.
अशा प्रकारच्या पळवाटांनी कोणताही मार्ग सापडणार नाही. कोणाला बळीचा बकरा बनवणे सोपे आहे. पण त्यात शहाणपण नाही. आजच्या परिस्थितीत आपल्याला हुशारीपेक्षा शहाणपण अधिक गरजेचे आहे. कारण लोक आधीच अस्वस्थ आणि नाराज झाले आहेत.
हे देखील वाचा –
मुंबईत कबुतरखान्यांसाठी जागा शोधण्याचे काम सुरू ! १३ ठिकाणे निश्चित केली
टोलचा पैसा गडकरींच्या दोन्ही मुलांना मिळतो 128 कंपन्यांचा तपशील देईन! दमानियांचा आरोप
संजय कपूरांच्या संपत्तीचा वाद ; प्रिया कपूरचा गोपनीयतेचा आग्रह ! हायकोर्टात अर्ज