Megablock News: मध्य रेल्वे (Central Railway) मार्गावरील भायखळा आणि शीव स्थानकावर पादचारी उड्डाणपुलाच्या (bridge) गर्डर्स म्हणजेच तुळई बसविल्या जाणार आहेत. याच कामासाठी उद्या शनिवार २७ सप्टेंबर रोजी रात्री दोन विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक (block) आयोजित केले आहेत. त्यामुळे या मार्गावरील काही लोकल आणि एक्स्प्रेस गाड्यांवर परिणाम होणार आहे.
भायखळा स्थानकावर पादचारी उड्डाणपुलाचे ४ स्टील गर्डर्स बसवण्यासाठी आणि शीव रेल्वेच्या पादचारी उड्डाणपुलाचा ४० मीटर स्पॅन बसवण्यासाठी दोन विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक्स घेण्यात आले आहेत.पहिला ब्लॉक शनिवारी रात्री १२.३० ते पहाटे ४.३० वाजेपर्यंत घेतला जाईल.हा ब्लॉक भायखळा आणि परेल दरम्यान अप व डाउन धीम्या व जलद मार्गावर घेण्यात आला आहे. तर दुसरा ब्लॉक शनिवारी मध्यरात्री १.१० ते पहाटे ४.१० वाजेपर्यंत घेण्यात आला आहे.हा ब्लॉक दादर आणि कुर्ला दरम्यान अप व डाऊन धीम्या आणि जलद मार्गावर घेण्यात आला आहे.
कर्जत स्थानकात विशेष ब्लॉक
मध्य रेल्वेने कर्जत स्थानकात प्री-नॉन-इंटरलॉकिंगच्या कामासाठी मध्य रेल्वेने विशेष ब्लॉक घेतला आहे.कर्जत स्थानकावर आज २६ सप्टेंबर ते १० ऑक्टोबरपर्यंत ब्लॉक घेतला आहे.या ब्लॉक कालावधीत रेल्वेवरील उपनगरीय सेवा आणि लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. त्यामुळे लोकल प्रवाशांना कर्जत ते खोपोली दरम्यान प्रवास करता येणार नाही.मध्य रेल्वेने नागनन्य केबिन ते कर्जत स्थानकाच्या फलाट क्रमांक २ आणि ३ दरम्यान कर्जत फलाट क्रमांक ३ ते चौक स्थानकादरम्यान २७ ते ३० सप्टेंबर रोजी सकाळी ११.२० ते सायंकाळी ५.२० वाजेपर्यंत ब्लॉक घेतला आहे.
हे देखील वाचा –
खेडकर पती-पत्नीविरोधात पोलिसांची लुकआऊट नोटीस