Home / देश-विदेश / NSA: सोनम वांगचुक यांच्या अटकेमुळे चर्चेत आलेला ‘राष्ट्रीय सुरक्षा कायदा’ नेमका काय आहे? जाणून घ्या

NSA: सोनम वांगचुक यांच्या अटकेमुळे चर्चेत आलेला ‘राष्ट्रीय सुरक्षा कायदा’ नेमका काय आहे? जाणून घ्या

Sonam Wangchuk NSA: लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा मिळवण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे प्रसिद्ध हवामान आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम...

By: Team Navakal
Sonam Wangchuk NSA

Sonam Wangchuk NSA: लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा मिळवण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे प्रसिद्ध हवामान आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना लेह पोलिसांनी अटक केली आहे. केंद्रशासित प्रदेशात हिंसाचार भडकावल्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायदा (National Security Act – NSA), 1980 अंतर्गत कठोर कारवाई करण्यात आली आहे.

ही अटक लेहमध्ये झालेल्या हिंसक निदर्शनांच्या दोन दिवसांनंतर झाली आहे या अटकेमुळे देशात ‘NSA’ कायद्याबद्दल पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

NSA कायदा काय आहे?

ज्या कायद्याखाली सोनम वांगचुक यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे, तो राष्ट्रीय सुरक्षा कायदा (NSA) हा केंद्र आणि राज्य सरकारांना अत्यंत मोठे अधिकार देतो. हा कायदा अशा व्यक्तींना 12 महिन्यांपर्यंत कोणताही खटला न चालवता ताब्यात ठेवण्याची मुभा देतो, ज्यांना राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका किंवा सार्वजनिक सुव्यवस्थेसाठी बाधक मानले जाते.

सामान्य कायद्यांनुसार (CrPC) अटक झालेल्या व्यक्तीला 24 तासांच्या आत न्यायालयात हजर करावे लागते आणि अटकेचे कारण सांगावे लागते. मात्र, NSA अंतर्गत अटकेचे कारण न सांगता व्यक्तीला 10 दिवसांपर्यंत ताब्यात ठेवण्याची, तसेच 24 तासांत कोर्टात हजर न करण्याची आणि वकिलाचा सल्ला घेण्यापासून रोखण्याचीही तरतूद आहे.

या कठोर तरतुदींमुळेच या कायद्याला अत्याचारी म्हटले जाते. हा कायदा 23 सप्टेंबर 1980 रोजी लागू करण्यात आला होता, याची मुळे ब्रिटिशकालीन रौलेट कायद्यात दडलेली आहेत.

वांगचुक यांच्यावरील कारवाईचे प्रमुख कारण

सोनम वांगचुक यांनी लडाखला सहाव्या अनुसूचीतील संरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू केले होते. केंद्रीय गृहमंत्रालयाने (MHA) असा आरोप केला आहे की, वांगचुक यांनी केलेल्या प्रक्षोभक भाषणामुळे जमाव भडकला आणि त्याने लेहमध्ये भाजपच्या कार्यालयाला आग लावली तसेच सरकारी वाहनांची जाळपोळ केली.

या घटनेनंतर सरकारने तातडीने कारवाई करत, वांगचुक यांनी स्थापन केलेल्या ‘स्टुडंट्स एज्युकेशनल अँड कल्चरल मूव्हमेंट ऑफ लडाख’ (SECMOL) या संस्थेचा परदेशी निधी स्वीकारण्याचा परवाना (FCRA) नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल रद्द केला होता. यानंतर लगेचच त्यांच्यावर NSA अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

हे देखील वाचा –  ‘तुम्ही तेही नाही करू शकणार!’: शोएब अख्तरने केली ‘ती’ चूक अन् अभिषेक बच्चनने पाकिस्तानची उडवली खिल्ली

Web Title:
संबंधित बातम्या