Home / News / Bihar Elections : बिहार निवडणुकीपूर्वी मोदी यांची भेट; महिलांच्या खात्यात 10 हजार रुपये

Bihar Elections : बिहार निवडणुकीपूर्वी मोदी यांची भेट; महिलांच्या खात्यात 10 हजार रुपये

Bihar Elections – बिहार राज्यात नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विधानसभा (Bihar elections) निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Prime Minister Narendra Modi) ‌मुख्यमंत्री महिला...

By: Team Navakal
Bihar Elections


Bihar Elections – बिहार राज्यात नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विधानसभा (Bihar elections) निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Prime Minister Narendra Modi) ‌मुख्यमंत्री महिला रोजगार योजने‌अंतर्गत (Women Employment Scheme)आज 75 लाख महिलांच्या बँक खात्यात प्रत्येकी 10,000 रुपये जमा केले. महाराष्ट्रात निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) जाहीर करून त्याचे वाटप केले आणि त्या बळावर भाजपा मित्रपक्षांनी निवडणूक जिंकली. आता मोदी सरकारने बिहारमध्ये हाच प्रयोग केला आहे. केवळ 10 हजार टाकले नाहीत तर पुढील 6 महिन्यांनी पात्र महिलांना 2 लाख देणार असल्याचे जाहीर करीत महिलांची मते जवळ जवळ खिशात टाकली.


ही योजना महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य आणि स्वयंरोजगार वाढवण्यासाठी सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. योजनेचा आढावा सहा महिन्यांनी घेऊन पात्र महिलांना टप्प्याटप्प्याने दोन लाख रुपयांपर्यंत मदत दिली जाणार आहे. कुटुंबातील एकाच महिलेला या योजनेचा लाभ मिळेल. या योजनेअंतर्गत आज एकूण 7,500 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले. नरेंद्र मोदींच्या या निवडणूकपूर्व योजनेला उत्तर म्हणून इंडिया आघाडीने आर्थिक मागासवर्गीयांसाठी दहा कलमी योजना जाहीर केली आहे. शिक्षण आणि नोकरी याबाबत या योजना आहे. मात्र ही योजना आता यशस्वी होण्याची चिन्हे नाहीत.


भाजपा – नितीश सरकारने (BJP–Nitish Kumar) गेल्या महिन्यात या योजनेची घोषणा केली होती. 7 सप्टेंबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली. यासाठी आतापर्यंत ग्रामीण व शहरी भागातील तब्बल 1 कोटीहून अधिक महिलांनी अर्ज केले आहेत. पहिल्या टप्प्यात यापैकी 75 लाख महिलांना प्रत्येकी 10 हजार रुपयांचा लाभ देण्यात आला. उर्वरित पात्र महिलांनाही टप्प्याटप्प्याने लाभ वितरित केला जाणार आहे. 2020 च्या आकडेवारीनुसार बिहारमध्ये महिला मतदारांची संख्या जवळपास 3.39 कोटी इतकी आहे. यापैकी आज तब्बल 22 टक्के महिला मतदारांना या योजनेचा लाभ देण्यात आला.


या योजनेचा शुभारंभ व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केल्यावर पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज पाठवलेले पैसे तुमच्या खात्यात पूर्णपणे सुरक्षित आहेत. कोणीही एकही पैसा चोरू शकणार नाही. पूर्वी योजनेचा निधी तुमच्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच चोरीला जात असे. ही प्रक्रिया चालू होती, तेव्हा माझ्या मनात विचार आला की, नितीशजींच्या सरकारने बिहारमधील बहिणी आणि मुलींसाठी किती मोठे आणि महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. एखादी बहीण किंवा मुलगी रोजगार किंवा स्वयंरोजगार करते, तेव्हा तिच्या स्वप्नांना नवे पंख मिळतात. समाजात तिचा सन्मान अधिक वाढतो. आजचा हा कार्यक्रम त्याचे उत्तम उदाहरण आहे. बहीण आरोग्यदायी, आनंदी असते आणि तिचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम असते, तेव्हा भावाला खरोखर आनंद मिळतो. त्यासाठीच आज तुमचे दोन भाऊ नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार मिळून तुमच्या सेवेसाठी, समृद्धीसाठी आणि स्वाभिमानासाठी सातत्याने काम करत आहेत.


महिलांसाठीच्या योजनांमधील बिहारची महिला रोजगार योजना ही आतापर्यंतची सर्वाधिक रक्कम असणारी योजना आहे. भाजपा आणि एनडीएने याआधी मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या आधी महिलांना रक्कम देणाऱ्या योजना आणल्या. त्याचा निवडणुकीत भरपूर फायदा झाला. महाराष्ट्रातही विधानसभा निवडणुकीआधी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना महिन्याला प्रत्येकी दीड हजार रुपये देणारी लाडकी बहीण योजना आणण्यात आली. त्यामुळे महाराष्ट्रात महायुतीला घसघशीत बहुमत मिळाले. विधानसभेत निवडून आल्यास दीड हजाराचे 2100 रुपये देण्याचे आश्वासनही दिले होते. पण मुख्यमंत्री होऊन महायुती सत्तेवर येऊन वर्ष होत आले, तरी या घोषणेची अंमलबजावणी झालेली नाही. हरयाणामध्येही आजपासूनच महिलांना 2100 रुपयांचा लाभ देणारी योजना अंमलात आली आहे.


गेल्या वर्षी जम्मू-काश्मीर येथील निवडणुकीवेळी माँ सन्मान योजनेंतर्गत मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेंतर्गत महिलांना दरवर्षी प्रत्येकी 18 हजार रुपये लाभ देण्याचे आश्वासन भाजपाने दिले होते. आता बिहारमध्येही हीच रणनीती वापरली जात आहे. या महिला योजनेतील लाभाच्या आकड्याने बिहारमध्ये उच्चांक गाठला आहे.


हे देखील वाचा – 

भारतीय औषधांवर 100 % कर; ट्रम्पचा पुन्हा धक्का! जेनेरिक वगळले

‘तुम्ही तेही नाही करू शकणार!’: शोएब अख्तरने केली ‘ती’ चूक अन् अभिषेक बच्चनने पाकिस्तानची उडवली खिल्ली

सोनम वांगचुक यांच्या अटकेमुळे चर्चेत आलेला ‘राष्ट्रीय सुरक्षा कायदा’ नेमका काय आहे? जाणून घ्या

Web Title:
संबंधित बातम्या