Sedan Car Price: केंद्र सरकारने लागू केलेल्या GST 2.0 मुळे भारतीय ऑटोमोबाइल (Automobile) क्षेत्रात मोठी उलथापालथ झाली आहे. सेडान (Sedan) सेगमेंटमधील कार्सच्या किंमतीत मोठी कपात झाली आहे.
जीएसटी बदलानंतर छोट्या कारवरील (4 मीटरपेक्षा कमी लांबीच्या) कराचा दर 18% पर्यंत कमी झाला आहे, तर 4 मीटरपेक्षा जास्त लांब आणि 1500cc पेक्षा कमी इंजिन क्षमता असलेल्या सेडान कारवर आता 40% GST आकारला जात आहे.
या कर संरचनेत झालेल्या बदलामुळे Maruti Suzuki Dzire सारख्या देशातील नंबर-1 सेडानसह अनेक लोकप्रिय मॉडेल्स स्वस्त झाले आहेत. ग्राहकांना या गाड्यांवर तब्बल 1.20 लाख रुपये पर्यंतचा थेट लाभ मिळणार आहे.
GST 2.0 नंतर स्वस्त झालेल्या 5 प्रमुख सेडान कार आणि त्यांच्यावरील ऑफर्स
मारुती सुझुकी डिझायर (Maruti Suzuki Dzire)
भारतीय बाजारात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या सेडानपैकी एक असलेल्या मारुती सुझुकी डिझायरच्या किमतीही मोठ्या प्रमाणात घटल्या आहेत. या कॉम्पॅक्ट सेडानच्या टॉप-स्पेक ZXi प्लस AMT व्हेरियंटवर 88,000 रुपयांपर्यंत, तर मॅन्युअल ट्रान्समिशन व्हेरियंटवर 85,000 रुपयांपर्यंतची बचत होईल. डिझायरची नवीन एक्स-शोरूम किंमत आता 6.26 लाख रुपये ते 9.31 लाख रुपयांदरम्यान झाली आहे.
होंडा अमेझ (Honda Amaze)
GST कपातीचा सर्वाधिक फायदा लेटेस्ट थर्ड जनरेशनच्या Amaze ला मिळाला आहे. या कॉम्पॅक्ट सेडानच्या टॉप-स्पेक ZX CVT व्हेरियंटच्या किमतीत तब्बल 1.20 लाख रुपयांपर्यंतची कपात झाली आहे. तिच्या मॅन्युअल ट्रान्समिशन ट्रिम्सवरही 85,000 रुपयांपर्यंतचा लाभ मिळत आहे. Amaze ची नवीन एक्स-शोरूम किंमत 7.41 लाख रुपये पासून सुरू होऊन 10 लाख रुपयांपर्यंत गेली आहे.
ह्युंदाई ऑरा (Hyundai Aura)
Hyundai Aura च्या किमतीतही लक्षणीय घट झाली आहे. या सेडानच्या टॉप-ऑफ-द-लाइन SX प्लस AMT व्हेरियंटच्या किमतीत सर्वात जास्त 76,000 रुपये ची घट झाली आहे. मॅन्युअल ट्रान्समिशन लाइन-अपमध्ये SX (O) ट्रिमवर 74,000 रुपये आणि CNG ट्रिम्सवर 70,000 रुपयांपेक्षा जास्त बचत करता येईल. GST दर कमी झाल्यानंतर ऑराची एक्स-शोरूम किंमत 5.98 लाख रुपयांपासून सुरू होते.
टाटा टिगोर (Tata Tigor)
पेट्रोल आणि CNG दोन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध असलेल्या टाटा टिगोर वर ग्राहक 81,000 रुपयांपर्यंत बचत करू शकतात. XZ प्लस Lux CNG आणि XZA प्लस CNG व्हेरियंटच्या किमतीत सर्वाधिक कपात झाली आहे. टिगोरची एक्स-शोरूम किंमत 5.49 लाख रुपयांपासून सुरू होते.
टोयोटा कॅमरी (Toyota Camry)
भारतीय बाजारातील प्रीमियम सेडानपैकी एक असलेल्या Toyota Camry Hybrid च्या किमतीत 1.02 लाख रुपयांची कपात झाली आहे. शक्तिशाली हायब्रीड पॉवरट्रेन असलेली कॅमरी आता 47.48 लाख रुपयांच्या नवीन एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध आहे.
या किमतीतील कपातीमुळे फेस्टिव्हल सीझनमध्ये सेडान कारची मागणी पुन्हा वाढण्याची अपेक्षा ऑटोमोबाइल कंपन्या व्यक्त करत आहेत.
हे देखील वाचा – ‘पप्पा जसे गेले तसे कोणाचेही न जावो’, कर्ज आणि अतिवृष्टीने जीव गमावलेल्या शेतकऱ्याच्या लेकीची सरकारला भावनिक साद