Ambabai Temple – अंबाबाईच्या मुखदर्शन रांगेत ७ आरोपींना एआयने (Artificial Intelligence) शोधले-अंबाबाईच्या नवरात्रौत्सवात (Navratri festival) पहिल्यांदाच यंदा एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या एआयने अंबाबाई मंदिरातील मुखदर्शनाच्या रांगेत उभ्या असलेल्या ७ आरोपींना शोधून काढले आहे. त्यापैकी चार जणांना पकडण्यात यश आले आहे.
मुखदर्शन रांगा आणि रात्रीचा पालखी सोहळा या दोन ठिकाणच्या संवेदनशील घडामोडी एआयने टिपल्या. या दोन्ही ठिकाणी भाविकांची सर्वाधिक गर्दी होते. या गर्दीत चोरांचाही वावर असतो. अंबाबाई मंदिरातील सर्व सुरक्षा यंत्रणा व भाविकांच्या गर्दीचे व्यवस्थापन आता ‘एआय’च्या मदतीने केले जात आहे. यासाठी अंबाबाई मंदिरातील १२२ कॅमेऱ्यांना हे तंत्रज्ञान जोडले गेले आहे. गेल्या चार दिवसांत ७ आरोपी मंदिर परिसरात आढळले. त्यापैकी चार जणांना पकडले. आरोपीसह भाविकांच्या चेहऱ्याचे फोटो (Facial recognition), तासनिहाय अंबाबाई मंदिरातील भाविक संख्या,अंबाबाई मंदिरातील गर्दीची क्षमता संपली की अलर्ट, हीट मॅप सिस्टीम-गर्दीची ठिकाणे शोधून अलर्ट आदी कामे एआयच्या माध्यमातून होत आहेत.
त्याचप्रमाणे शहरातील १५७ कॅमेऱ्यांना एआय तंत्रज्ञानाने जोडले असून त्यातून वाहतुकीच्या कोंडीची ठिकाणे शोधली आहेत. सीपीआर ते अंबाबाई मंदिर, रंकाळा टॉवर (Rankala)ते गंगावेश (Gangavesh), महाद्वार ते पापाची तिकटी, बिंदू चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जास्त कोंडी आढळली आहे.
सोनम वांगचुक यांच्या अटकेमुळे चर्चेत आलेला ‘राष्ट्रीय सुरक्षा कायदा’ नेमका काय आहे? जाणून घ्या