Russian Oil – जोपर्यंत भारत (India)रशियाकडून (Russian)तेल खरेदी करणे थांबवत नाही, तोपर्यंत अमेरिका-भारत व्यापार करार होणार नाही, असे अमेरिकेने स्पष्ट केले आहे. मात्र, ईटीच्या अहवालानुसार भारत अनुवांशिकरित्या मॉडिफाइड मक्याच्या आयातीवरील काही निर्बंध उठवण्यास आणि अधिक संरक्षण उत्पादने खरेदी करण्यास तयार आहे.
वाणिज्य मंत्री पीयूष गोयल (Minister Piyush Goyal)यांच्या नेतृत्वाखालील भारतीय शिष्टमंडळाने अमेरिकन अधिकाऱ्यांसोबत कराराच्या विविध पैलूंवर सकारात्मक चर्चा केली. दोन्ही देशांनी करारासाठी संभाव्य रोडमॅपवर मतांची देवाणघेवाण केली आणि वाटाघाटी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. १६ सप्टेंबर रोजी अमेरिकेचे शिष्टमंडळ भारतात व्यापार करारावर चर्चा करण्यासाठी आले होते. ही बैठक ट्रम्प प्रशासनात ५०% शुल्क लादल्यानंतरची पहिली चर्चा होती, ज्यामध्ये जवळजवळ सात तास चर्चासत्र झाले. सरकारच्या निवेदनात म्हटले की, या बैठकीत व्यापार करारांच्या अनेक पैलूंवर सकारात्मक चर्चा झाली. दोन्ही देशांचे ध्येय परस्पर फायदेशीर आणि द्विपक्षीय व्यापाराला अधिक बळकटी देणारा करार करणे आहे.
अमेरिकेने भारतावर जास्त शुल्क लादल्यामुळे भारताने प्रत्युत्तरात्मक २५% शुल्क लागू केले आणि रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल २५% दंड शुल्क लादले. यामुळे भारताच्या निर्यातीवर अंदाजे ८५,००० कोटी नुकसान झाले आणि दोन्ही देशांमधील संबंध ताणले. तथापि, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (President Donald Trump)यांच्या अलीकडील विधानांमुळे तणाव काही प्रमाणात कमी झाला आहे.
याशिवाय, ट्रम्प यांनी ब्रँडेड आणि पेटंट केलेल्या प्रिस्क्रिप्शन औषधांवर १००% कर जाहीर केला आहे, हा कर १ ऑक्टोबर २०२५ पासून लागू होईल. याआधी, भारतावर रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल ५०% कर लागू होता, जो २७ ऑगस्टपासून लागु झाला होता. यामुळे कपडे, दागिने, फर्निचर आणि सीफूड यासारख्या भारतीय उत्पादनांची निर्यात महाग झाली आहे, तरी औषधांना या शुल्कातून सूट देण्यात आली आहे.
हे देखील वाचा –
वाहतूककोंडी सोडविण्यासाठी मुंबईत नवीन ६ बोगदे बांधणार