Home / महाराष्ट्र / Yeoor forest: येऊर जंगलातील बेकायदेशीर टर्फवर महापालिकेची कारवाई

Yeoor forest: येऊर जंगलातील बेकायदेशीर टर्फवर महापालिकेची कारवाई

Yeoor forest: येऊरच्या जंगलात (Yeoor forest) बेकायदेशीररीत्या उभारण्यात आलेल्या टर्फवर (turf) ठाणे महापालिकेने (Thane Municipal Corporation) कारवाई केली आहे. महापालिकेने...

By: Team Navakal
Yeoor forest

Yeoor forest: येऊरच्या जंगलात (Yeoor forest) बेकायदेशीररीत्या उभारण्यात आलेल्या टर्फवर (turf) ठाणे महापालिकेने (Thane Municipal Corporation) कारवाई केली आहे. महापालिकेने टर्फची जमीन उखडून टाकली असून, संबंधित व्यावसायिकांवर वर्तकनगर पोलीस (Police)ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या टर्फमुळे प्रखर प्रकाशझोत व ध्वनिप्रदूषणामुळे वन्यजीवांना त्रास होत होता, तसेच परिसंस्थेला धोका निर्माण होत असल्याचे पर्यावरणवाद्यांचे म्हणणे होते. २०२३ मध्ये व्यावसायिकांनी सुमारे १० बेकायदेशीर टर्फ उभारले होते. या टर्फवर खेळण्यासाठी ताशी दीड ते दोन हजार रुपये आकारले जात होते. मागील काही वर्षांपासून येऊर परिसरात आदिवासींच्या जमिनींवर अनधिकृत बंगले, हॉटेल व टर्फ उभे राहिलेले आहेत. त्यामुळे आदिवासी तसेच स्थानिक नागरिक त्रस्त झाले होते, तर वन्यजीवांचेही मोठे नुकसान होत होते. अनेक आंदोलने व तक्रारीनंतर अखेर ही कारवाई करण्यात आली.

याविरोधात येऊर एन्व्हायर्नमेंटल सोसायटीने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. न्यायालयाने जुलै २०२५ मध्ये सर्व टर्फ पाडण्याचे आदेश दिल्यानंतर अखेर महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी कठोर कारवाई केली. या प्रक्रियेत टर्फची जमीन उखडण्यात आली, पाणी व वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे.


हे देखील वाचा – 

रशियन तेल खरेदी करणे थांबवा तरच करार! अमेरिकेचा इशारा

सोनम वांगचुक यांची जोधपूर तुरुंगात रवानगी

अंबाबाईच्या मुखदर्शन रांगेत ७ आरोपींना एआयने शोधले

Web Title:
संबंधित बातम्या