Madhya pradesh cm मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना (Madhya pradesh cm) निवासस्थानापासून ते मंत्रालयापर्यंत हेलिकॉप्टरने जाता यावे यासाठी दोन्ही ठिकाणी हेलिपॅड उभारले जाणार आहेत. या दोन्ही जागांचे नुकतेच सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणाचा अहवाल नागरी उड्डयन विभागाला पाठवण्यात आला आहे.
हवाई उड्डान विभागाने मुख्यमंत्र्यांच्या घराजवळच्या सहा जागांची पाहणी केली आहे. या संदर्भात अद्याप अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. या सर्वेक्षणात उड्डान विभाग, मुख्यमंत्री निवासस्थान व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी भाग घेतला. मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी घरापासून ते मंत्रालयापर्यंत रस्ते मार्गे जाऊन लोकांना त्रास होऊ नये म्हणून हेलिपॅड उभारण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार हे हेलिपॅड उभारले जाणार आहेत. मंत्रालयाच्या जवळ असलेल्या भडभडा घाटाजवळच्या जागेबरोबरच प्रेमपुरा गाव, पोलीस लाईन व राष्ट्रीय संग्रहालया जवळच्या जागांची पाहणी करण्यात आली आहे.
राष्ट्रीय संग्रहालयाने आपली जागा देण्यास आधीच नकार दिला आहे. मंत्रालयाच्या जवळ एका खाजगी कंपनीच्या जागेत हे हेलिपॅड उभारले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात असून या विषयीचा अंतिम निर्णय पुढच्या महिन्यात घेण्यात येणार आहे. या संदर्भात हवामान विभागाचाही अहवाल महत्त्वाचा असणार आहे. या हेलिपॅडना प्रत्येकी १५ ते २० कोटी रुपये खर्च येणार आहे.
—————————————————————————————————————————————————–
हे देखील वाचा –