Doctors remove 29 spoons: उत्तर प्रदेशातील डॉक्टरांनी (UP doctor) एका रुग्णाच्या पोटातून (Stomach) शस्त्रक्रियेद्वारे अनेक चमचे व इतर साहित्य बाहेर काढले आहे. घरच्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे आपण रागाने या वस्तू गिळल्याचे या रुग्णाने मान्य केले असून आता त्याची तब्येत सुधारत आहे.
उत्तर प्रदेशातील हापुर शहरातील एका खाजगी रुग्णालयात बुलंदशहरचा एक रुग्ण पोटात दुखत असल्याची तक्रार घेऊन आला होता. डॉक्टरांनी त्याची सोनोग्राफी केली असता त्याच्या पोटात काहीतरी धातुच्या वस्तू असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याच्या पोटातून 29 चमचे (spoons), 19 टुथब्रश (Toothbrush) व 2 पेन (Pen) काढण्यात आले. एका व्यक्तीच्या पोटात इतक्या वस्तू पाहून डॉक्टरांनीही आश्चर्य व्यक्त केले. या व्यक्तीने म्हटले की, माझे कुटुंब माझ्याकडे दुर्लक्ष करत होते. मला वेळेवर खायलाही देत नव्हते. त्यामुळे मी रागाने या वस्तू गिळल्या. मला स्वतःला त्रास देण्याची इच्छा होती. हा एक प्रकारचा मानसिक आजार असल्याचे डॉक्टरांनी म्हटले असून या व्यक्तीला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. त्याची प्रकृती आता सुधारत असल्याची माहितीही डॉक्टरांनी दिली आहे.
हे देखील वाचा –
रशियन तेल खरेदी करणे थांबवा तरच करार! अमेरिकेचा इशारा