Video of a leopard लखनौ परिसरात बिबट्याचा (video of a leopard)वावर असल्याचा कृत्रिम बुद्धीमत्तेच्या सहाय्याने तयार केलेला व्हिडीओ समाजमाध्यमावर प्रसारित केल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. वन विभागानेही या परिसरात बिबट्याचा कोणताही वावर नसल्याचा निर्वाळा दिला आहे.
दोन तरुणांनी लखनौच्या रुचीखंड, आशियाना व गोमती नगर परिसरात बिबटा फिरत असल्याचा व्हिडीओ तयार केला. त्यासाठी त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून चालणाऱ्या बिबट्याची छबी तयार केली होती . त्यानंतर तो त्यांनी व्हॉटसअप व इतर समाजमाध्यमावर प्रसारित केला. या व्हिडीओमुळे लोकांच्या मनात भिती निर्माण झाली. नागरिकांनी आपल्या मुलांना बाहेर जाण्यास मनाई केली.
त्यानंतर पोलिसांनी शोध घेऊन या दोन मुलांना अटक केली असून त्यांनी गंमत म्हणून आपण हा व्हिडीओ तयार केल्याचे म्हटले आहे. यावर वनविभागानेही तातडीने कारवाई करत काही ठिकाणी कॅमेऱ्यांचे सापळे लावले व तीन पथकांकडून रात्रीच्या वेळी गस्त घातली. त्यांनाही या व्हिडीओत काहीही तथ्य नसल्याचे आढळून आले. या परिसरातील काही सीसीटीव्हींची तपासणी केली असता त्यातही या बिबट्याचा कोणताही वावर आढळला नाही. पोलिसांनी नागरिकांना संयम बाळगण्याचे व घाबरुन न जाण्याचे आवाहन केले.
——————————————————————————————————————————————————
हे देखील वाचा –