Home / क्रीडा / Asia Cup 2025: 41 वर्षांनंतर पहिल्यांदाच आशिया कपच्या अंतिम फेरीत India vs Pakistan भिडणार; मोफत कुठे पाहू शकता सामना?

Asia Cup 2025: 41 वर्षांनंतर पहिल्यांदाच आशिया कपच्या अंतिम फेरीत India vs Pakistan भिडणार; मोफत कुठे पाहू शकता सामना?

India vs Pakistan Asia Cup 2025 Final: तब्बल 41 वर्षांच्या आशिया कपच्या (Asia Cup 2025) इतिहासात प्रथमच भारत (India) आणि...

By: Team Navakal
India vs Pakistan Asia Cup 2025 Final

India vs Pakistan Asia Cup 2025 Final: तब्बल 41 वर्षांच्या आशिया कपच्या (Asia Cup 2025) इतिहासात प्रथमच भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी संघ अंतिम सामन्यात एकमेकांना भिडणार आहेत. आज (28 सप्टेंबर) दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणारा हा महासंग्राम क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहे.

भारताचे वर्चस्व

भारतीय संघाने या स्पर्धेत अपराजित राहत अंतिम फेरी गाठली आहे. कर्णधार सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखालील टीम इंडियाने गट फेरी आणि सुपर फोरमधील आपले सर्व सामने जिंकले आहेत, ज्यात पाकिस्तानवरील दोन विजयांचा समावेश आहे.

युवा सलामीवीर अभिषेक शर्मा याने 309 धावा फटकावत संघाच्या विजयाचा पाया रचला आहे, तर फिरकीपटू कुलदीप यादव (Kuldeep Yadav) याच्या सातत्यपूर्ण गोलंदाजीमुळे भारताचे वर्चस्व सिद्ध झाले आहे.

दुसरीकडे, पाकिस्तानचा संघ गट फेरीत थोडा डगमगला, पण नंतर त्याने जोरदार पुनरागमन केले. शाहीन आफ्रिदी आणि हारिस रौफ या वेगवान गोलंदाजांच्या जोरावर संघ अंतिम फेरीपर्यंत पोहोचला आहे. मात्र, दबावाच्या क्षणी पाकिस्तानची फलंदाजी कोसळण्याची शक्यता असल्याने त्यांच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष असेल.

मैदानावरील तणाव आणि दुखापती

या अंतिम लढतीपूर्वी मैदानातील तणावही वाढला आहे. यापूर्वी स्पर्धेत नाणेफेकीनंतर कर्णधार सूर्यकुमार यादव याने पाकिस्तानच्या खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यास नकार दिल्याच्या ‘नो हँडशेक’ वादामुळे दोन्ही संघांमधील कडवट स्पर्धा अधिक तीव्र झाली आहे.

या सामन्यापूर्वी भारतीय संघाला फिटनेसची चिंता आहे. अष्टपैलू हार्दिक पंड्या याची हॅमस्ट्रिंग दुखापत आणि तिलक वर्मा (याची किरकोळ दुखापत चिंतेचा विषय आहे. अभिषेक शर्माला श्रीलंकेविरुद्ध स्नायूंचा त्रास झाला होता, पण गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्नी मॉर्केल यांनी त्याला फिट घोषित केले आहे. या सर्वात मोठ्या सामन्यासाठी टीम इंडियाचा अंतिम प्लेइंग इलेव्हन काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

India vs Pakistan Asia Cup 2025 Final: सामना कधी आणि कुठे पाहता येईल?

  • सामना: भारत विरुद्ध पाकिस्तान, आशिया कप 2025 अंतिम सामना.
  • वेळ: रविवार, 28 सप्टेंबर, रात्री 8:00 वाजता (IST).
  • ठिकाण: दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम.
  • टीव्हीवर: सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपण.
  • लाईव्ह स्ट्रीमिंग: SonyLIV ॲप आणि वेबसाइटवर, तसेच FanCode वर उपलब्ध.
  • जियो युजर्सना खास ऑफर: 175 रुपयांच्या रिचार्जमध्ये 10 जीबी डेटासह 10 OTT ॲप्सचा ॲक्सेस मिळून सामना फ्री मध्ये पाहता येईल.

हे देखील वाचा –  Actor Vijay Karur Stampede: अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशामुळे झाली? कारण आले समोर

Web Title:
संबंधित बातम्या