Redmi A4 5G: सध्या सुरू असलेल्या Amazon Great Indian Festival Sale मध्ये तुम्ही जबरदस्त परफॉर्मन्स असलेला आणि स्वस्त 5G स्मार्टफोन शोधत असाल, तर Redmi A4 5G हा एक उत्तम पर्याय आहे. हा फोन 4GB आणि 4GB व्हर्च्युअल RAM (एकूण 8GB पर्यंत RAM) सह येतो. विशेष म्हणजे या सेलमध्ये हा फोन सर्वात आकर्षक डील्ससह उपलब्ध आहे.
Redmi A4 5G: किंमत आणि ऑफर्स
Amazon India वर Redmi A4 5G ची किंमत फक्त 7499 रुपये आहे. या सेलमध्ये या फोनवर तुम्हाला 374 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळू शकतो.
हा फोन तुम्ही अगदी 364 रुपयांच्या सुरुवातीच्या EMI वर देखील खरेदी करू शकता. एक्सचेंज ऑफरमधील सवलत तुमच्या जुन्या फोनची स्थिती, ब्रँड आणि कंपनीच्या एक्सचेंज पॉलिसीवर अवलंबून असेल.
Redmi A4 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- डिस्प्ले: यात 6.88 इंचाचा मोठा डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन 1600×720 पिक्सल आहे.
- रिफ्रेश रेट आणि ब्राइटनेस: हा डिस्प्ले 120Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो आणि त्याची पीक ब्राइटनेस पातळी 600 nits आहे.
- प्रोसेसर आणि RAM: यात Snapdragon 4s Gen 2 चिपसेट प्रोसेसर आणि 4GB वास्तविक RAM असून, 4GB व्हर्च्युअल RAM च्या मदतीने त्याची एकूण क्षमता 8GB पर्यंत वाढवता येते.
- कॅमेरा: यामध्ये LED फ्लॅशसह 50 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा दिला आहे. तर 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा मिळतो.
- बॅटरी: या फोनला पॉवर देण्यासाठी 5160mAh क्षमतेची दमदार बॅटरी देण्यात आली आहे, जी 18 वॉटच्या फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
- ऑपरेटिंग सिस्टम: हा फोन Android 14 वर आधारित Hyper OS वर काम करतो.
- सुरक्षितता: बायोमेट्रिक सुरक्षिततेसाठीयात साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे.
- कनेक्टिव्हिटी: 5G, ड्युअल 4G VoLTE, वाय-फाय 802.11 ac (2.4GHz + 5GHz), ब्लूटूथ 5.3, GPS + GLONASS, USB Type-C पोर्ट आणि 3.5mm हेडफोन जॅक असे पर्याय यात उपलब्ध आहेत. तसेच, यात FM रेडिओचा (FM Radio) देखील समावेश आहे.
- रंग: हा फोन स्टारी ब्लॅक (Starry Black) आणि स्पार्कल पर्पल (Sparkle Purple) या दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे.
हे देखील वाचा – Actor Vijay Karur Stampede: अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशामुळे झाली? कारण आले समोर