Shani Shingnapur – गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील शनिशिंगणापूर देवस्थानमध्ये विविध प्रकारचे गैरव्यवहार झाल्याचे समोर येत होते. त्यातून झालेल्या अधिकाऱ्यांच्या आत्महत्या (Suicide of officials)मात्र आता शनिशिंगणापूरचं विश्वस्त मंडळ (Shani Shingnapur temple trust) अखेर बरखास्त करण्यात आलं आहे. त्यानंतर आता देवस्थानचे संपूर्ण कार्यालय सील करण्यात आले. जिल्हाधिकारी पंकज कुमार अशिया (Collector Pankaj Kumar Ashiya)यांनी स्वतः पोलीस बंदोबस्तात हे कार्यालय सील केले.
आता शनैश्वर देवस्थानची सूत्रे जिल्हाधिकारी पंकज कुमार अशिया यांनी हाती घेतली आहेत. विश्वस्त मंडळ बरखास्त झाल्यानंतरही प्रशासकीय कार्यालयातून कागदपत्रांची हेराफेरी सुरू असल्याच्या खात्रीशीर माहितीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी धडक कारवाई केली. भ्रष्टाचाराशी संबंधित पुरावे नष्ट केले जावू नयेत,म्हणून ही कारवाई करण्यात आली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.या कारवाईदरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या.
सर्वात मोठं प्रश्नचिन्ह म्हणजे कारवाईच्या वेळी कार्यकारी अधिकारी (Executive Officer)कार्यालयात हजर नव्हते.त्यांच्या गैरहजेरीमुळे प्रशासनावरील संशयाचे सावट अधिकच गडद झाल्याचे बोलले जात आहे.या कारवाईसाठी गावातील सामाजिक कार्यकर्ते (Social activists), ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्यांच्या साक्षीनेच कार्यालय सील करण्यात आले.देवस्थान विश्वस्त मंडळावर गेल्या काही महिन्यांपासून गैरव्यवहाराचे आरोप होत होते.देणग्यांमधील अपहार (corruption), खर्चातील अनियमितता, कामकाजातील ढिसाळपणा अशा विविध मुद्द्यांवरून विश्वस्त मंडळाविरोधात असंतोष वाढला होता. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी विश्वस्त मंडळ बरखास्त करून प्रशासकीय नियंत्रण हाती घेतले. मात्र, बरखास्तीनंतरही देवस्थानातील कागदपत्रांवर शंका निर्माण झाल्याने प्रशासनाला थेट सील करण्याचा निर्णय घ्यावा लागला.
हे देखील वाचा –
वाहतूककोंडी सोडविण्यासाठी मुंबईत नवीन ६ बोगदे बांधणार
सोनम वांगचुक यांची जोधपूर तुरुंगात रवानगी
आज भारत-पाकिस्तान अंतिम सामना ; उबाठाला अचानक बहिष्काराची पुन्हा आठवण झाली