Elephant Omkar – गोवा (Goa) हद्दीतून परत आल्यावर आक्रमक ‘ओंकार’ हत्ती शनिवारी दुपारी सिंधुदुर्गातील सातोसे-मडूरा (Satose-Madura)परिसरात दाखल झाला असून सायंकाळची त्याने कास गावात प्रवेश केला होता.हत्ती गावात आल्याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली. अनेकांनी मोबाईलवर फोटो आणि व्हिडिओ टिपून ते सोशल मीडियावर (social media)व्हायरल केले आहेत.
सध्या हा हत्ती सातोसे-मडूरा परिसरात शेतकरी व बागायत क्षेत्रात फिरत आहे. गावाच्या अंगणाजवळ आणि पाणवठ्याजवळही त्याची हालचाल दिसून येत आहे.दिवसाढवळ्या तो शेतात शिरून भातशेती,भाजीपाला (vegetables) आणि फळबागांचे नुकसान करत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. वन विभागाने या हत्तीला सुरक्षित पकडून त्याच्या मूळ अधिवासात पाठवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत, मात्र ते प्रयत्न यशस्वी होत नाहीत.
हत्तीला जेरबंद करणे किंवा हुसकावून लावणे कठीण ठरत आहे. त्याला सुरक्षित पकडून दूरच्या जंगलात सोडावे. यामुळे मानवी जीवितहानी टळेल आणि शेतीचे नुकसानही थांबेल, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.दरम्यान हत्तीचे फोटो-व्हिडिओ काढताना त्याला त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी तसेच लांब अंतर ठेवावे, अशी सूचना बांदा पोलिस व वन अधिकार्यांनी केली आहे.
हे देखील वाचा –
वाहतूककोंडी सोडविण्यासाठी मुंबईत नवीन ६ बोगदे बांधणार
आज भारत-पाकिस्तान अंतिम सामना ; उबाठाला अचानक बहिष्काराची पुन्हा आठवण झाली
शनीशिंगणापूर देवस्थानच्या कार्यालयाला अखेर ठोकले सील ! जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई