Modi-Shah Should Survey Marathwada – महाराष्ट्रावर संकट कोसळले आहे आणि आजही कोसळत आहे. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोडी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा राज्यात येत आहेत. त्यांनी किमान मराठवाड्याचा हेलिकॉप्टरने तरी दौरा करावा, असा हल्लबोल आज उबाठा(UBT) खासदार संजय राऊत(MP Sanjay Raut) यांनी केला.
संजय राऊत म्हणाले की, मुंबईमध्ये लोकांना भारत-पाकिस्तान (India v/s Pakistan )क्रिकेट सामना पाहता यावा म्हणून गृहमंत्र्यांनी सुरक्षेसंदर्भात खास सूचना दिल्या आहेत. रेस्टॉरंट, हॉटेलमध्ये कुणी टीव्हीवर सामना दाखवत असेल तर त्यांना संरक्षण द्या, असे आदेश देण्यात आले.
पण मराठवाड्यातील शेतकऱ्यांना कोणतेही संरक्षण नाही. तेथील परिस्थितीकडे दुर्लक्ष केले जात आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षासह अनेक लोक गुंतून पडले आहेत.
पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये पालकमंत्र्यांनी ठाण मांडून बसण्याची गरज असताना धाराशिवचे पालकमंत्री केवळ दोन टेम्पो घेऊन फोटोसेशन करतात, हे दुर्दैवी आहे. उद्या अमित शहा येणार आहेत, नरेंद्र मोदी येणार आहेत. आता सगळे त्यांच्यामागे धावणार आहेत. या दोघांनी मराठवाडा दौरा करावा. हेलिकॉप्टरने का होईना पण करावा.
हे देखील वाचा –
आक्रमक ‘ओंकार’ हत्ती गोव्यातून पुन्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखलआज
भारत-पाकिस्तान अंतिम सामना ; उबाठाला अचानक बहिष्काराची पुन्हा आठवण झाली
शनीशिंगणापूर देवस्थानच्या कार्यालयाला अखेर ठोकले सील ! जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई