Home / देश-विदेश / कॅनडा सरकारचा मोठा निर्णय! लॉरेन्स बिश्नोई टोळीला ‘दहशतवादी संघटना’ म्हणून केलं घोषित

कॅनडा सरकारचा मोठा निर्णय! लॉरेन्स बिश्नोई टोळीला ‘दहशतवादी संघटना’ म्हणून केलं घोषित

Bishnoi Gang: भारतात तुरुंगात असलेल्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) याच्या टोळीला कॅनडा सरकारने ‘दहशतवादी संघटना’ (Terror Entity) म्हणून घोषित...

By: Team Navakal
Bishnoi Gang

Bishnoi Gang: भारतात तुरुंगात असलेल्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) याच्या टोळीला कॅनडा सरकारने ‘दहशतवादी संघटना’ (Terror Entity) म्हणून घोषित केले आहे. या टोळीला कॅनडाच्या क्रिमिनल कोड अंतर्गत दहशतवादी संस्थांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे.

कॅनडा सरकारने हा निर्णय अशा वेळी घेतला आहे, जेव्हा गेल्या काही वर्षांपासून बिश्नोई टोळी कॅनडामध्ये विशेषतः शीख समुदायाला लक्ष्य करत असल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या होत्या.

कॅनडाच्या कारवाईचे नेमके कारण आणि सरकारी भूमिका

गेल्या काही महिन्यांपासून बिश्नोई टोळीने कॅनडात वास्तव्यास असलेल्या खलिस्तान समर्थक घटकांना, ज्यात शीख नागरिक देखील आहेत लक्ष्य केल्याच्या बातम्या होत्या. कॅनडा सरकारने जाहीर केले आहे की, बिश्नोई टोळीने कॅनडात राहणाऱ्या विशिष्ट समुदायांना हिंसाचार , दहशत आणि खंडणीच्या माध्यमातून लक्ष्य केले आहे.

कॅनडाचे सार्वजनिक सुरक्षा मंत्री गॅरी आनंदसंगेरी यांनी सांगितले की, बिश्नोई टोळीने विशिष्ट समुदायांना लक्ष्य करून असुरक्षिततेचे वातावरण निर्माण केले आहे. या गुन्हेगारी दहशतवादी गटाला यादीत टाकल्यामुळे त्यांच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी अधिक प्रभावी साधने मिळतील.

भारत-कॅनडा संबंध सुधारण्याच्या दृष्टीनेही या कारवाईकडे पाहिले जात आहे. कारण भारत सरकारने कॅनडाकडे वारंवार खलिस्तानी दहशतवादी घटक आणि कॅनडातून कार्यरत असलेल्या संघटित गुन्हेगारांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. कॅनडाने स्पष्ट केले आहे की, ही टोळी हत्येचा, गोळीबाराचा आणि जाळपोळीचा वापर करते आणि प्रवासी समुदायाला, त्यांचे प्रमुख सदस्य आणि सांस्कृतिक व्यक्तींना लक्ष्य करते.

बिश्नोई टोळीचा वादग्रस्त इतिहास आणि कायदेशीर परिणाम

लॉरेन्स बिश्नोई हा सध्या गुजरातच्या साबरमती मध्यवर्ती तुरुंगातआहे. भारतातही त्याची टोळी गायक सिद्धू मुसेवाला आणि मुंबईतील राजकारणी बाबा सिद्दीकी यांच्या हत्येसह अनेक मोठ्या प्रकरणांमध्ये आरोपी आहे. त्याने यापूर्वी अभिनेता सलमान खानलाही धमकी दिली होती.

अनमोल बिश्नोई, गोल्डी ब्रार आणि रोहित गोदारा हे त्याचे प्रमुख साथीदार परदेशातून टोळी चालवत असल्याचे मानले जाते.

या संघटनेच्या समावेशामुळे कॅनडाच्या क्रिमिनल कोड अंतर्गत दहशतवादी संस्थांच्या यादीतील संख्या 88 झाली आहे. दहशतवादी संघटना घोषित केल्यामुळे बिश्नोई टोळीची कॅनडामधील मालमत्ता, वाहने आणि पैसे गोठवले किंवा जप्त केले जाऊ शकतात. तसेच, कॅनडाच्या इमिग्रेशन अधिकाऱ्यांना बिश्नोई टोळीच्या सदस्यांना कॅनडामध्ये प्रवेशाबाबत निर्णय घेण्यासाठी कायदेशीर आधार मिळेल.

हे देखील वाचा – Ahilyanagar News: अहिल्यानगरमधील तणावावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या