Home / देश-विदेश / भारत-भूतानमध्ये लवकरच सुरू होणार रेल्वे; 4000 कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मंजुरी

भारत-भूतानमध्ये लवकरच सुरू होणार रेल्वे; 4000 कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मंजुरी

India Bhutan Rail Project: भारत आणि भूतान या दोन देशांमध्ये पहिल्यांदाच रेल्वे सुरू होणार आहे. या द्विपक्षीय भागीदारीतील महत्त्वपूर्ण...

By: Team Navakal
 India Bhutan Rail Project

 India Bhutan Rail Project: भारत आणि भूतान या दोन देशांमध्ये पहिल्यांदाच रेल्वे सुरू होणार आहे. या द्विपक्षीय भागीदारीतील महत्त्वपूर्ण टप्पा मानल्या जाणाऱ्या या उपक्रमासाठी दोन मोठे रेल्वे प्रकल्प नुकतेच मंजूर करण्यात आले आहेत. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या प्रोजेक्टबाबत नुकतीच माहिती दिली.

मंजूर झालेले दोन महत्त्वाचे रेल्वे प्रकल्प

भारत आणि भूतान यांच्यातील सुमारे 700 किलोमीटर लांबीच्या सीमेवर ही रेल्वे कनेक्टिव्हिटी केली जाणार आहे. हे प्रकल्प भूतानचा आंतरराष्ट्रीय व्यापार मार्गांपर्यंत पोहोच वाढवण्यास मदत करेल.

कोक्राझार-गेलेफू नवीन मार्ग (Kokrajhar-Gelephu New Line):

हा मार्ग आसाममधील कोक्राझार आणि चिरांग जिल्ह्यांना भूतानच्या सरपांग प्रदेशाशी जोडेल. या प्रकल्पासाठी 3,456 कोटी रुपये इतका मोठा गुंतवणूक खर्च निश्चित करण्यात आला आहे.

हा मार्ग केवळ लोक आणि वस्तूंची वाहतूक सुलभ करणार नाही, तर भूतानमधील गेलेफू येथे विकसित होत असलेल्या ‘माइंडफुलनेस सिटी’ला आर्थिक आणि रोजगाराच्या संधीही उपलब्ध करून देईल.

बनारहाट-सामत्से नवीन मार्ग (Banarhat-Samtse New Line):

हा प्रकल्प पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी जिल्ह्याला भूतानच्या सामत्से प्रदेशाशी जोडेल. यासाठी 577 कोटी रुपये गुंतवणूक करण्यात येणार असून, यामुळे सीमापार व्यापार आणि जोडणीला मोठी चालना मिळेल. भूतान सरकार सामत्से प्रदेशाला औद्योगिक केंद्र म्हणून विकसित करत आहे.

भूतानच्या विकासात भारताचे मोठे योगदान

दरम्यान, भूतानच्या 13व्या पंचवार्षिक योजनेसाठी (2024 ते 2029 पर्यंत) भारत सरकारने तब्बल 10,000 कोटी रुपयांच्या मदतीचे पाठबळ जाहीर केले आहे. ही रक्कम 12व्या पंचवार्षिक योजनेतील आकडेवारीपेक्षा 100% अधिक आहे. या मदतीत सामुदायिक विकास प्रकल्प आणि आर्थिक प्रोत्साहन कार्यक्रमाचासमावेश आहे.

हे देखील वाचा – कॅनडा सरकारचा मोठा निर्णय! लॉरेन्स बिश्नोई टोळीला ‘दहशतवादी संघटना’ म्हणून केलं घोषित

Web Title:
संबंधित बातम्या