Taslima Nasreen: लेखिका तस्लिमा नसरीन आपल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. बंगाली संस्कृतीचा पाया हिंदू संस्कृती आहे, ज्यात बंगाली मुस्लिमांच्या संस्कृतीचाही समावेश आहे, असे नसरीन यांनी म्हटले आहे.
त्यांच्या या विधानावर ज्येष्ठ गीतकार-कवी जावेद अख्तर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी ‘गंगा जमुनी अवधी संस्कृती’ ॉचे महत्त्वही मान्य करण्याचे आवाहन केले आहे.
तस्लिमा नसरीन यांचे वक्तव्य
दुर्गा पूजा उत्सवातील अष्टमीच्या दिवशी नसरीन यांनी दुर्गा पंडालचे फोटो पोस्ट करून आपले मत मांडले. त्यांनी स्पष्ट केले की, धर्माची पर्वा न करता, बंगाली लोक भारताशी जोडलेले आहेत.
तस्लिमा नसरीन त्यांच्या पोस्टमध्ये म्हणाल्या की, “लपवण्यासारखे काही नाही हिंदू संस्कृती हाच बंगाली संस्कृतीचा पाया आहे. आम्ही बंगाली इतिहासात आम्ही कोणताही धर्म किंवा तत्त्वज्ञान स्वीकारले असले तरी आमच्या राष्ट्रीय अस्मितेमध्ये, आम्ही भारताचेच आहोत. भारतातील हिंदू, बौद्ध, ख्रिस्ती, मुस्लिम आणि अगदी नास्तिकांचेही पूर्वज हे सर्व किंवा जवळपास सर्व भारतीय हिंदूच होते.”
इस्लामिक परंपरांवर अनेकदा टीका करणाऱ्या नसरीन यांनी दावा केला की, बंगाली मुस्लिमांची संस्कृती अरबी नाही, तर ती हिंदू परंपरेत खोलवर रुजलेली आहे. “एखादा बंगाली मुस्लिम असला तरी, त्याची संस्कृती अरब संस्कृती नाही. त्याची संस्कृती बंगाली आहे आणि ती संस्कृती हिंदू परंपरेत रुजलेली आहे. ढोल वाजवणे, संगीत, नृत्य या बंगाली संस्कृतीच्या मूळ अभिव्यक्ती आहेत. याला नकार देणे म्हणजे स्वतःला नाकारणे आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
We the people of traditional Awadh have great respect for Bengali culture , language and literature. But if some one is unable to appreciate and respect the great Ganga Jamni Awadh culture and its refinement its sophistication then it’s completely his lose . This culture has…
— Javed Akhtar (@Javedakhtarjadu) September 30, 2025
जावेद अख्तर यांचे उत्तर
प्रसिद्ध लेखक आणि कवी जावेद अख्तर यांनी नसरीन यांच्या मताशी सहमती दर्शवली, परंतु त्यांनी हिंदू आणि मुस्लिम संस्कृतीच्या संयोगातून निर्माण झालेल्या परिपक्व मिश्रणाचे कौतुक करण्याची गरज असल्याचे सांगितले.
अख्तर म्हणाले, “आम्ही पारंपरिक अवधचे लोक बंगाली संस्कृती, भाषा आणि साहित्याचा खूप आदर करतो. पण जर कोणी महान गंगा जमुनी अवधी संस्कृती आणि तिच्या परिष्करण आणि सुसंस्कृतपणाची प्रशंसा आणि आदर करू शकत नसेल, तर ते पूर्णपणे त्यांचे नुकसान आहे. या संस्कृतीचा अरबशी काहीही संबंध नाही.”
त्यांनी पुढे नमूद केले की, पाश्चात्य संस्कृतीप्रमाणेच पर्शियन आणि मध्य आशियाई संस्कृती आणि भाषाही आपल्या संस्कृती आणि भाषेत रुजल्या आहेत, पण त्या आपल्या अटींवर रुजल्या आहेत. अनेक बंगाली आडनावेही पर्शियन आहेत, असे अख्तर यांनी स्पष्ट केले.
हे देखील वाचा – आजपासून ‘हे’ 15 मोठे नियम बदलणार! एलपीजीपासून ते रेल्वे तिकीट बुकिंगपर्यंत थेट तुमच्या खिशावर परिणाम