Maharashtra GCC Policy: राज्य मंत्रिमंडळाने ‘ग्लोबल कॅपॅसिटी सेंटर 2025 धोरणास’ (Global Capacity Centre Policy 2025) मंजुरी दिली आहे. जागतिक गुंतवणुकीला आकर्षित करण्यासाठी आणि राज्याला या क्षेत्रात अग्रणीबनवण्याचे या धोरणाचे उद्दिष्ट आहे.
हे नवे धोरण ‘विकसित भारत 2047’ च्या राष्ट्रीय उद्दिष्टाशी सुसंगत आहे. तसेच, 2030 पर्यंत भारताला ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याच्या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ध्येयाला बळ देणारे ठरणार आहे.
GCC धोरणाचे प्रमुख उद्दिष्ट
GCC 2025 धोरण हे वेगाने वाढणाऱ्या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्राची स्पर्धात्मकता मजबूत करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी तयार करण्यात आले आहे. यामुळे राज्यामध्ये नवीन गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होईल.
सध्या भारत हा ग्लोबल कॅपॅसिटी सेंटर्स साठी जगातील निर्विवाद केंद्र म्हणून उदयास आला आहे. देशात सध्या 1,800 हून अधिक GCCs कार्यरत असून, त्यामध्ये 2.16 दशलक्ष (21.6 लाख) व्यावसायिक कार्यरत आहेत आणि या क्षेत्रामुळे राष्ट्रीय GDP मध्ये सुमारे $68 अब्ज (Billion) चे योगदान मिळत आहे. जागतिक स्तरावरील जवळपास अर्धे GCCs आता भारतात आहेत.
या क्षेत्राच्या वाढीमध्ये भारतातील कुशल मनुष्यबळ, उत्तम पायाभूत सुविधा आणि सकारात्मक धोरणात्मक वातावरणाचा मोठा वाटा आहे.
कर्करोग उपचारासाठी व्यापक धोरण मंजूर
GCC धोरणाव्यतिरिक्त, राज्य मंत्रिमंडळाने कर्करोगाच्या उपचारांसाठी एक व्यापक धोरणही मंजूर केले आहे. या धोरणांतर्गत राज्यातील नागरिकांना उच्च दर्जाचे कर्करोग उपचार उपलब्ध करून दिले जातील.
या धोरणामध्ये तीन-स्तरीय सर्वसमावेशक कर्करोग उपचार सेवा प्रदान करण्याचा प्रस्ताव आहे, ज्यामुळे उपचारांची गुणवत्ता आणि उपलब्धता वाढेल.
हे देखील वाचा – “तुझ्या कुठल्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं?”, गोपीचंद पडळकर यांची जयंत पाटलांवर पुन्हा टीका