Madhya Pradesh news : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) छिंदवाडा येथे खोकल्याच्या औषधाने (cough syrups) ६ मुलांचा बळी घेतला असून राजस्थानातही (Rajasthan) १ मुलाचा बळी गेला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी अखेर या औषधावर बंदी घातली आहे. या प्रकरणी विविध पातळीवर तपास सुरु असून औषधात धोकादायक रसायनाचे प्रमाण अधिक झाल्याने या मुलांचा मृत्यू ओढवला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
मध्य प्रदेशातील सरकारी रुग्णालयातील भोंगळ कारभार व भ्रष्टाचार पुन्हा एकदा समोर आला आहे. गेल्या महिन्यात मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात खोकल्याची साथ आली होती. त्यावेळी अनेक मुलांनी सरकारी रुग्णालयातून खोकल्याचे औषध घेतले . हे औषध घेतल्यानंतर त्यांची किडनी निकामी होऊन त्यांचा मृत्यू झाला. मध्य प्रदेशचे आरोग्य अधिकारी डॉ. नरेश गुन्नाडे यांनी म्हटले की, या मुलांना औषध घेतल्यानंतर लघवी करताना जळजळ, ताप न उतरणे अशी लक्षणे दिसू लागली. त्यांची तब्येतही दिवसेंदिवस खालावली . त्यात काही मुलांचा मृत्यू झाला. काही मुलांना नागपूरमध्ये दाखल करण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या औषधावर बंदी घातली आहे.
एका अहवालात म्हटले की, या औषधामध्ये डायएथिलीन ग्लायक़ल चे प्रमाण अधिक असल्याने ते धोकादायक आहे. मृत मुलांच्या किडनीच्या तपासणी नंतर हा अहवाल समोर आला आहे. दरम्यान राजस्थानातही याच औषधाने एका मुलाचा मृत्यू झाला आहे. तिथेही या औषधावर बंदी घालण्यात आली आहे. ही औषधे राज्य सरकारकडून खरेदी करण्यात आली होती.
हे देखील वाचा –
शिंदे स्वतःला ठाकरे समजतात; संजय राऊतांची बोचरी टीका
मला शांतता नोबेल द्या! अमेरिकेचा अपमान करू नका!ट्रम्प यांचा हट्ट ! सात युद्ध थांबवल्याचा दावा