Assembly Election – क्रिकेट समालोचक (Cricket commentator) आणि राजकारणी नवज्योतसिंग सिद्धूची (Navjot Singh Sidhu) पत्नी पुन्हा निवडणुकीच्या राजकारणात उतरणार आहे. नवज्योत कौर सिद्धू (Navjot Kaur) यांनी आजच अमृतसर पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.
चंदीगड (Chandigarh)येथे काँग्रेस (Congress) पक्षाच्या बैठकीनंतर त्यांनी आपली इच्छा बोलून दाखवली. त्या म्हणाल्या की, मला जनतेची सेवा करायची आहे. हे काम आणखी उत्तम रितीने करण्यासाठी आमदार (MLA) होण्याची आवश्यकता आहे. मतदारसंघातील लोकही निवडणूक लढवण्यासाठी आग्रही आहेत. दरम्यान, २०२७ मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी पत्नी सज्ज असल्याची प्रतिक्रिया सिद्धू यांनी दिली.
त्यांनी याआधीही अमृतसर पूर्व मतदारसंघाचे (Amritsar East constituency)प्रतिनिधित्व केले होते. २०१२ मध्ये भाजपाच्या तिकीटावर त्या आमदार झाल्या होत्या. मात्र २०१६ मध्ये त्यांनी पतीसोबत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र, त्या काँग्रेसपासूनही काहीशा दूरावल्याचे चित्र होते. २०१९ मध्ये त्यांनी सक्रीय राजकारणातून निवृत्तीचा निर्णय घेतला होता. आता पुन्हा एकदा राजकारणात सक्रीय होण्याचा निर्णय घेतल्याने घडामोडींना वेग आला आहे. पेशाने डॉक्टर असलेल्या नवजोत कौर यांना चौथ्या पातळीचा कर्करोग झाला होता. उपचारानंतर २०२३ मध्ये त्यांना कर्करोगमुक्त जाहीर करण्यात आले होते.
हे देखील वाचा –
निराश, हताश शेतकरी; मृत्यूला कवटाळू लागले