G7 Nations – वॉशिंग्टन – युक्रेनविरोधातील युद्ध रोखावे म्हणून रशियावर दबाव आणण्याच्या अमेरिकेच्या प्रयत्नांना आता जी-७ देशांचेही समर्थन मिळत आहे. याचा भाग म्हणून अमेरिकेसह कॅनडा, फ्रान्स, जर्मनी (Germany), इटली, जपान (Japan)आणि ग्रेट ब्रिटन हे देश रशियन तेल खरेदीदार देशांवर शुल्क लावण्याच्या विचारात आहेत.
जर्मनीतील म्युन्स्टर येथे काल जी-७ देशांच्या अर्थमंत्र्यांच्या (G7 finance ministers)बैठक झाली. त्यामध्ये रशियाविरोधात कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रशियन तेलाचे प्रमुख खरेदीदार असल्याने या संभाव्य कारवाईचा भारत आणि चीनला फटका बसू शकतो. पण जी-७ बैठकीनंतर प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात भारत (India)किंवा चीन (China)यांचा उल्लेख नाही.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी आधीच भारतावर ५० टक्के तर चीनवर ३० टक्के आयात शुल्क लादले आहे. युक्रेनवरील आक्रमणामुळे रशियाचे उत्पन्न कमी करण्यासाठी जी-७ देशांच्या अर्थमंत्र्यांनी संयुक्त उपाययोजना अमलात आणण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, भारताने ही भूमिका म्हणजे दुहेरी मापदंड असल्याची टीका केली आहे. भारताच्या मते, रशियन (Russia) तेलाची खरेदी कमी करणे हे इराण आणि व्हेनेझुएला या प्रतिबंधित देशांकडून तेल खरेदी करण्याची परवानगी मिळण्यावर अवलंबून आहे.
हे देखील वाचा –
निराश, हताश शेतकरी; मृत्यूला कवटाळू लागले
नवज्योतसिंग सिद्धूची पत्नी पुन्हा विधानसभा लढवणार
नक्वींची माफी? मात्र चषक देणार नाही! चषक हवा तर सूर्यकुमारला दुबईला पाठवा