Navi Mumbai International Airport: मुंबई महानगर क्षेत्रातील (MMR) हवाई प्रवाशांची मागणी पूर्ण करण्यासाठी बहुप्रतिक्षित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (Navi Mumbai International Airport) लवकरच सेवेत दाखल होत आहे. अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी या जागतिक दर्जाच्या विमानतळाचे उद्घाटन 8 ऑक्टोबर रोजी होणार असल्याची माहिती दिली.
या उद्घाटनापूर्वीच, देशातील विमान वाहतूक सुरक्षा प्राधिकरणाकडून म्हणजेच डीजीसीए (DGCA) कडून या विमानतळाला ‘एअरोड्रोम परवाना’ मिळाला आहे, ज्यामुळे ते व्यावसायिक उड्डाणे सुरू करण्यास सज्ज झाले आहे.
अदानी समूहाची भूमिका आणि प्रकल्पाचे स्वरूप
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विकास नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (NMIAL) या संयुक्त उपक्रमाद्वारे करण्यात आला आहे. यात अदानी समूहाची 74% भागीदारी आहे, तर उर्वरित 26% हिस्सा महाराष्ट्र सरकारची भूविकास संस्था सिडको (CIDCO) कडे आहे.
प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित करताना गौतम अदानी यांनी 8 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या उद्घाटनापूर्वी विमानतळाला भेट दिली. यावेळी त्यांनी दिव्यांगांसह बांधकाम कामगार, महिला कर्मचारी, अभियंते, अग्निशमन दलाचे जवान आणि सुरक्षारक्षक अशा विविध स्तरांवरील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.
Ahead of the inauguration of Navi Mumbai International Airport on 8 Oct, I met with our differently-abled colleagues, construction workers, women staff, engineers, artisans, fire fighters and the guards who helped bring this vision to life. I felt the pulse of a living wonder – a… pic.twitter.com/Uj7Ikue7vM
— Gautam Adani (@gautam_adani) October 1, 2025
विमानतळाची क्षमता आणि वैशिष्ट्ये
‘NMI’ (एनएमआय) हा कोड मिळालेले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे मुंबई महानगर क्षेत्रातील दुसरे मोठे विमानतळ असेल. हा प्रकल्प एकूण पाच टप्प्यांमध्ये पूर्ण करण्याची योजना आहे. एकदा हे विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर ते दरवर्षी सुमारे 90 दशलक्ष (9 कोटी) प्रवाशांची हाताळणी करू शकेल, तसेच 3.2 दशलक्ष मेट्रिक टन (32 लाख मेट्रिक टन) मालवाहतूक करण्याची क्षमता या विमानतळात असेल.
या मोठ्या क्षमतेमुळे हे विमानतळ आशियातील सर्वात मोठ्या विमान वाहतूक केंद्रांपैकी एक बनणार आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, भारतात सध्या 162 कार्यरत विमानतळ आहेत आणि नवी मुंबई विमानतळ या संख्येत भर घालणार आहे.
हे देखील वाचा – बरेलीमध्ये 48 तास इंटरनेट बंद, 4 जिल्ह्यांत हाय अलर्ट; कारण काय?